शिवजयंती साजरी करण्यावरून विधानसभेत गदारोळ; मुनगंटीवार आणि अजितदादांमध्ये खडाजंगी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, March 21, 2022

शिवजयंती साजरी करण्यावरून विधानसभेत गदारोळ; मुनगंटीवार आणि अजितदादांमध्ये खडाजंगी

 शिवजयंती साजरी करण्यावरून विधानसभेत गदारोळ; मुनगंटीवार आणि अजितदादांमध्ये खडाजंगी


मुंबई (कटूसत्य वृत्त):- छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी केली जात आहे. शिवजयंती साजरी करण्यावरून विधानसभेत आज जोरदार खडाजंगी झाली. भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता.

त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात उत्तर दिले.

भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले, राज्याचे मुख्यमंत्री तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करत आहेत. मात्र, राज्याचे अधिकारी 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी होणार असल्याचे म्हणत आहेत. तिथी प्रमाणे शिवजयंती साजरी करण्यावर विचार करण्याची मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

अजित पवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्याला उपस्थित केला. अजित पवार यांनी म्हटले की, शिवजयंती साजरी करण्यावरून वाद घालू नये. याआधी आघाडी सरकारच्या काळात संशोधनानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्म दिनांक 19 फेब्रुवारी 1630 निश्चित करण्यात आली. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री किल्ले शिवनेरी येथे 19 फेब्रुवारी रोजी शासकीय कार्यक्रमात उपस्थित असतात. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचे प्रमुख म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यांच्यासह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षाच्या आमदारांनीदेखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. विधीमंडळाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे. ज्यांना अभिवादनासाठी जायचे असेल त्यांनी जाऊन अभिवादन करावे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages