शेतीपंप विज तोडणीला स्थगिती - ऊर्जा मंत्री - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 15, 2022

शेतीपंप विज तोडणीला स्थगिती - ऊर्जा मंत्री

 शेतीपंप विज तोडणीला स्थगिती - ऊर्जा मंत्री


मुंबई,
(कटूसत्य वृत्त):- शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी विज मिळाली पाहिजे विज जोडणी तोडता कामा अतिवृष्टी महापुर अवकाळी पाऊस या आस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत विज बिल भरले नाही म्हणून ऊर्जा विभागाने विज तोडणी सुरू केली आहे ती तात्काळ थांबवावी. या मागणीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी सभागृहात एकच गोंधळ घातला.या गदारोळात सभागृहाचे कामकाज तीनदा तहकूब करावे लागले. या प्रश्नावर चर्चा केल्यानंतर विज जोडणी किमान तीन महिने तोडणी कारवाईस स्थगिती देत असल्याची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत केली.ऊर्जामंत्री राऊत म्हणाले की, आज सकाळी सभागृह सुरु झाल्यापासून विरोधक यांच्याशी सत्ताधारी आमदार यांनीही संसदीय आयुधांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले.  महावितरणची ६४ हजार कोटी थकबाकी झाली आहे. पण जे दर महिना वीज बिल भरतात त्यांना सूट देण्यात आलीय. वसुलीसाठी पाठपुरावा सुरू आहे. वीज बिल भरणे यासाठी काही सूट देण्यात आली होती. २ हजार ३७८ कोटींचा भरणा कृषी ग्राहकासाठी केला. त्यामुळे काही ठिकाणी वीज खंडित करण्यात आली. काही ठिकाणी विरोध झाला.कृषी ग्राहक यांना सवलत देण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा कालावधी एक महिना आहे. मागील सरकारने वीज बिल दिलीच नाही. दरम्यानच्या कोरोना काळात वीज खंडित झाली नाही. वीज सैनिक शहीद झाले. चक्रीवादळ आले, महापूर आला पण आम्ही धावून गेलो. कुठे कमी पडलो नाही. जगात देशात वीज टंचाई निर्माण झाली. पण, राज्यात लोड शेडींग केले नाही. नियमित वीज पूर्ववत व्हावा हेच धोरण होते. आज सभागृहात जो काही गोंधळ झाला. त्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून वीज जोडणी पूर्ववत करण्याचा निर्णय घेत असल्याची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली.शेतकरी, सूतगिरणी, उद्योग यांची वीज कनेक्शन पुन्हा सुरू केली जाईल. तसेच, आगामी तीन महिने शेतकऱ्यांसाठी महत्वाचे आहेत. त्यामुळे पुढील तीन महिने वीज तोडणी करणार नाही. महावितरणची आर्थिक परिस्थिती पाहता सर्वानी वीज बिल भरून सहकार्य करा, असं आवाहनही त्यांनी केलं.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages