गदारोळामुळे तीनवेळा रोखले सभागृहाचे कामकाज
मुंबई,(कटूसत्य वृत्त):- शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या वीज जोडणी कापण्याच्या प्रकारावरून दोन्ही बाजूच्या संतप्त प्रतिक्रिया काल विधानसभेत उमटल्या. त्यावरून झालेल्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज तीनवेळा तहकूब करावे लागले.आज सकाळी सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने वीज जोडणीचा मुद्दा सभागृहात मांडला सत्ताधारी पक्षाचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात हा महत्वाचा मुद्दा उपस्थित केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा उचलून धरत त्यांना पाठिंबा जाहीर केला आणि गोंधळाला सुरुवात झाली. सभागृहात विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे कामकाज चालविणे अशक्य झाल्याने प्रथम १० मिनिटे, नंतर १५ मिनिटे आणि तिसऱ्यांदा २० मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल सुरुवात देवेंद्र फडणवीसांनी केली. प्रवीण दरेकर यांच्यावर मजूर सोसायटीच्या अध्यक्षपदावरून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या सभागृहात अनेक आमदार मजूर सोसायटीच्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत, रोज एकेकाच्या नावाचा भांडाफोड आम्ही करू आणि कोर्टात जाऊ असे ते म्हणाले, मात्र त्यानंतर कल्याणकर यांनी लगेचच शेतकऱ्यांच्या वीज कापणीचा मुद्दा उपस्थित केला आणि दोन्ही बाजूचे सदस्य आक्रमक झाले. या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.
0 Comments