एसटी संपावरून विधानसभेत गदारोळ अधिवेशन संपण्यापूर्वी सरकार करणार निवेदन
.jpg)
मुंबई,(कटूसत्य वृत्त):-मागील तीन महिन्यापासून चाललेला एसटी कामगारांचा संप अद्यापही मिटलेले नाही. या प्रश्नावर न्यायालयात याचिका प्रलंबित आहेत.मात्र निर्णय होताना दिसत नाहीत. चालक कर्मचारी ईतर वाहन चालवून उदरनिर्वाह करीत आहेत. तेव्हा यावर सरकारने सकारात्मक चर्चा करून त्वरीत तोडगा काढावा मागणी भाजपाच्या आशिष शेलार यांनी केली.दरम्यान सरकारने अधिवेशन संपण्यापूर्वी यावर निवेदन करावे असे निर्देश तालिका अध्यक्षांनी दिले. राज्यात एसटीचा बेमुदत संप असून संपकरी कर्मचाऱ्यापौकी सुमारे शंभर कामगार कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. संपाबाबत तोडगा निघत नाही त्यामुळे त्याच्या कुटुंबाच्या हालआपेष्ठा चालू आहेत.म्हणून काही लोक कुटुंब चालविण्यासाठी कोणत्याही प्रकारचे वेठबिगारी काम करीत आहेत. तर एसटी बंद असल्यामुळे ग्रामिण भागातील जनतेचे हाल होत आहेत.शेतकरी कष्टकरी जनता त्रस्त आहे. विद्यार्थ्यांचेही मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.आता तर परीक्षा सुरू होत आहेत. विद्यार्थी परीक्षेला जाणार कसे, न्यायालयात तर तारखावर तारखा पडत आहेत. सरकार कडून कोणताच तोडगा निघत नाही. उलट संपकऱ्यांना कामावरून कमी करू, कंत्राटी कामगार भरती करू अशा धमक्या दिल्या जातात. तेव्हा हा विषय राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तेव्हा यावर सभागृहाचे कामकाज बाजूला ठेवून तातडीने चर्चा करावी. अशी मागणी शेलार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे सभागृहात केली.यावर तालिका अध्यक्षांनी स्थगन प्रस्ताव नाकारल्यामुळे सभागृहात भाजपा आमदारांनी गदारोळ घातला तेव्हा अधिवेशन संपण्यापुर्वी सरकारने निवेदन करावे असे निर्देश तालिका अध्यक्षांनी दिले.
0 Comments