Hot Posts

6/recent/ticker-posts

कुर्डुवाडी शहर महामानवांच्या जयंती पूर्वी खड्डे व धूळ मुक्त करा.!

 कुर्डुवाडी शहर महामानवांच्या जयंती पूर्वी खड्डे व धूळ मुक्त करा.!

                   


रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची मागणी.!


कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):-कुर्डूवाडी शहरामध्ये दि.११ एप्रिल महात्मा ज्योतिराव फुले तर दि.१४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सोहळा सार्वत्रिक साजरा करण्यात येत असून या महामानवांच्या जयंती चे औचित्य साधून मध्यवर्ती जयंती उत्सव समिती चे अध्यक्ष बापूसाहेब जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम व कार्यक्रम सर्वत्र मोठ्या प्रमाणात होणार आहेत.त्यामुळे जयंती निमित्त रस्त्यावरील सार्वजनिक चौकातील परिसर स्वच्छ असायला हवा जयंती पूर्वी शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवून त्यावर पाणी मारून तात्पुरत्या स्वरूपात कुर्डूवाडी धुळ व खड्डे मुक्त करण्याची मागणी आर.पी.आय चे तालुका संघटन सचिव विशाल मोरे यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्‍मण राठोड यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यासाठी सार्वत्रिक शामियाने उभे केले जातात सार्वजनिक ठिकाणी सजावट केली जाते महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी शहरातील ज्येष्ठ नागरिक महिला मुले मुली मोठ्या प्रमाणात बाहेर येऊन हे उत्सव अगदी आनंदाने साजरे करतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावरील बंद दिवे चालू करूूून शहर व सार्वजनिक ठिकाणे प्रकाशमय ठेवावीत हे सर्व दि.१० एप्रिल महामानवांच्या जयंती पूर्वी करण्यात यावेेे असे निवेदनात म्हंटले आहे.जयंती पूर्वी शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवून व धूळ उडू नये म्हणून पाणी मारणे कामी नगरपालिका बांधकाम विभागाच्या मार्फत संबंधित ठेकेदाराला व आरोग्य तसेच विद्युत विभागाला या सर्व बाबतचे आदेश दिले असून सार्वजनिक ठिकाणे व पुतळा परिसराची स्वच्छता कायम ठेवली जाते.मुख्याधिकारी लक्ष्‍मण राठोड.

Reactions

Post a Comment

0 Comments