Hot Posts

6/recent/ticker-posts

कार्यकर्त्यांना दिलेला शब्द पूर्ण करू शकलो याचे समाधान बाळराजे पाटील यांची भावनिक कृतज्ञता

 कार्यकर्त्यांना दिलेला शब्द पूर्ण करू शकलो याचे समाधान बाळराजे पाटील यांची भावनिक कृतज्ञता

           


मोहोळ (कटूसत्य वृत्त):-
मोहोळ मतदारसंघातील विविध प्रश्न मार्गी लागावेत अशी दुर्दम्य इच्छाशक्ती माजी आमदार राजन पाटील यांच्या मनात आहे. याशिवाय मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी सातत्याने शिस्तबद्ध पाठपुरावा केल्यामुळे मतदारसंघास विकासकामांच्या बाबत झुकते माप मिळत आहे. गेल्या अनेक वर्षापासून रखडलेले रस्त्यांची कामे मार्गी लागत असल्याचे पाहून मनाला खूप मोठे समाधान वाटत आहे. शब्द पूर्ण केल्यानंतर कार्यकर्त्यांच्या चेहर्‍यावरील ओसंडून वाहणारा आनंद हीच अनगरकर -पाटील परिवाराच्या राजकीय जीवनातील सर्वोत्तम शिदोरी आहे. असे भावनिक उदगार जि. प. सदस्य बाळराजे पाटील यांनी काढले.सावळेश्वर ता.मोहोळ येथे माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली २५/१५ योजने अंतर्गत रु.२०.०० लाख मंजूर झालेल्या सावळेश्वर ते जुना सोलापूर या रस्त्याचे भुमिपूजन आमदार यशवंत माने आणि जि.प. सदस्य बाळराजे पाटील  यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. त्यावेळी मार्गदर्शन करताना बाळराजे बोलत होते.यावेळी या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पंचक्रोशीतील राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांच्या वतीने आमदार यशवंत माने आणि बाळराजे पाटील यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.यावेळी धनाजी गावडे,मोहन चौगुले,आबा चटके,तात्या पाटील,महेंद्र वाघमारे,दादा नागणे,मळगे सावकार,कैलास माळगे,श्रीमंत चटके,गणेश कोळी,हनुमंत पाटील,तुकाराम शिंदे,महादेव गावडे,समाधान गावडे,अर्जुन साबळे,अनिकेत गुंड,फारूक तांबोळी,रोहन सरवळे,दीपक गावडे,प्रमोद नीळ,नाना गावडे,सुधीर लांडगे उपस्थित होते.मोहोळ मतदारसंघाचे विकास मार्गदर्शक तथा माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या मतदारसंघातील विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी आमदार यशवंत माने यांच्या शासन स्तरावरील पाठपुराव्यामुळे मोहोळ मतदारसंघातील  रस्त्यांसाठी सर्वाधिक निधी मंजूर झाला आहे. मतदारसंघातील सर्वच भागातील गावातील प्रमुख समस्या म्हणजे रस्ते हिच आहे. या भागातील सर्वच रस्ते अद्यावत करण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील आहे.बाळराजे पाटील चेअरमन लोकनेते शुगर केवळ विकासाचे राजकारण..मोहोळ विधानसभा मतदारसंघातील एकही गाव विकासनिधी पासून वंचित राहणार नसुन  यापुढील काळातही माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ मतदारसंघात केवळ विकासाचे आणि विकासाचे राजकारण होईल. केवळ दोन वर्षात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामुळे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा विकासात्मक चेहरामोहरा बदलत आहे याचे मनस्वी समाधान वाटत आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, वीज विषयक समस्या ग्रामस्थांनी युवा नेते बाळराजे पाटील, अजिंक्यराणा पाटील यांच्या माध्यमातून पक्षाकडे मांडाव्यात. मतदारसंघाचा दक्ष लोकप्रतिनिधी या नात्याने त्या समस्या प्राधान्याने आणि अधिक गतिमान निर्णयप्रक्रियेने सोडवण्याचा माझा निश्‍चितपणे प्रयत्न राहणार आहे.आ. यशवंत माने मोहोळ विधानसभा.
Reactions

Post a Comment

0 Comments