मराठा सेवा संघाकडून नूतन पोलिस उपनिरीक्षकांचा मोहोळमध्ये सत्कार
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग यांचे मार्फत घेण्यात आलेल्या व ज्या परीक्षेचा नुकताच निकाल लागला त्यातून मोहोळ तालुक्यातील यशस्वी झालेल्या नूतन पोलीस उपनिरीक्षकांचा मोहोळ मराठा सेवा संघाच्या वतीने सेवा संघाच्या कार्यालयात मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी वाय एस पी सूर्यकांत पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून सकल मराठा प्रदेश समन्वयक माऊलीदादा पवार आणि जिजाऊ ब्रिगेडच्या शहराध्यक्ष शिवमती ऍड. माधुरीताई पाटील होत्या. मराठा सेवा संघाचे मोहोळ तालुका अध्यक्ष मनोजकुमार मोरे यांनी प्रस्ताविक केले तर आकाश फाटे यांनी पाहुण्याची ओळख करुन दिली. याप्रसंगी मेघा बाबर (पोखरापूर), राजकुमार कांबळे,शंकर पाटील (कुरुल),आणि आकाश नाईकवाडी(वडाचीवाडी)या नूतन पोलीस उपनिरीक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात.फेटा, पुष्पगुच्छ, शंभूराजे यांची प्रतिमा आणि शाहूंच्या आठवणी हे पुस्तक सर्व निमंत्रित पाहुण्यांना सन्मान करण्यात आला.सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त करुन सर्वांचे अभिनंदन केले. यावेळी उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, कवियत्री डॉ. स्मिता पाटील , रुपाली डोके, संध्या फाटे, संभाजी चव्हाण , संतोष गायकवाड , शरद माने , चिन्मय गव्हाणे, शरद माने, दीपक पारडे सर, संदीप भोसले, सुशील ताकमोगे ,मान्यवरांचा मित्र परिवार सदर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी दीपक देशमुख सर, लक्ष्मण कदम, सखाराम पाटील, धनराज फाटे,रणधीर देशमुख यांनी परिश्रम घेतले. अजय चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर ऍड श्रीरंग लाळे यांनी आभार मानले.
0 Comments