राज्यातील शिक्षकांसाठी ठाकरे सरकारने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
मुंबई (कटूसत्य वृत्त):- गेल्या काही दिवसांपासून राज्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षक बदल्यांचा प्रश्न चर्चेत आहे. कोरोनाची साथ असल्यामुळे अनेक दिवस शिक्षक बदलीची प्रक्रिया रखडली होती. राज्यभरात पुन्हा एकदा शिक्षक बदलीची प्रकिया सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली होती. जिल्हा परिषद शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया मार्चपासून राबविण्यात येणार आहे, अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली होती. सॉफ्टवेअर टेंडरचे काम अद्याप पुर्ण झालेले नाही. सॉफ्टवेअर टेंडरचं काम शक्य तेवढ्या वेळेत पुर्ण करून मे महिन्यात ऑनलाईन पद्धतीने बदल्या केल्या जातील, असं हसन मुश्रीफ म्हणाले होते. शिक्षक बदल्यांसंदर्भात पुणे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी माहिती दिली आहे. नवीन अद्ययावत सॉफ्टवेअर निर्मितीसाठी एका कंपनीची नेमणूक करण्यात आली होती. सॉफ्टवेअर अपडेटचे काम सुरू असून शिक्षकांची माहिती त्यामध्ये देण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पारदर्शक असून यापुढील शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईनच्या माध्यमातून होणार आहेत, असं आयुष प्रसाद यांनी म्हटलं आहे.दरम्यान, राज्यामध्ये जवळपास साडेतीन लाख शिक्षक आहेत. या शिक्षकांचा जुना डाटा किंवा काही जुन्या गोष्टी आहे. ज्यामध्ये मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक या गोष्टींचा समावेश होतो. मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक या गोष्टी अपडेट करण्यात येणार आहेत. शिक्षकांच्या सदरील बदल्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करता येणार नाही, अशा प्रकारे सॉफ्टवेअर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती आयुष प्रसाद यांनी दिली आहे.
0 Comments