समतामुलक समाज निर्माण करणेसाठीच बहुजन दलित महासंघाची स्थापना आनंद वैराट-अध्यक्ष बहुजन दलित महासंघ
पुणे (प्रविण शेंडगे):- 'सामाजिक असुरक्षिततेच्या काळात, महात्मा फुले यांचा वारसा जोपासत बहुजन दलित महासंघ सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यात यशस्वी होईल' असा विश्वास दलित नेते दादासाहेब सोनवणे यांनी व्यक्त केला. ते बहुजन दलित महासंघ या सामाजिक संघटनेच्या महात्मा फुले वाडा येथे संपन्न झालेल्या स्थापना कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.ते पुढे म्हणाले की,' बहुजन दलितांची एकजूट झाल्याशिवाय देशातील सामाजिक प्रश्न निकालात निघणार नाहीत. बहुजन दलित महासंघ स्थापन झाल्यामुळे आता सकारात्मक चित्र निर्माण होईल. तसेच,या स्थापनेमुळे मानवमुक्तीचा लढाई गतीमान होईल. या सर्व कार्यात कार्यकर्ते यशस्वी होतील' असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला.ॲड. भूपेंद्र शेंडगे म्हणाले की, ' संघटनांच्या वाढत्या संख्या समाजाच्या जागृतीचे लक्षण आहे. बहुजन दलित महासंघ ही संघटना समाज जागृतीसह अन्याय अत्याचार थोपवून धरेल याची खात्री आहेच परंतू विधायक आणि निर्णायक कार्य ही संघटना उभारेल अशी ऐतिहासिक खुणगाठ कार्यकर्त्यांनी मनाशी बांधावी.' बहुजन दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद वैराट यांनी, 'महापुरुषांचे विचार आपल्याला वैचारिक ऊर्जा देणारे आहेत. याच बळावर आपण समतामूलक समाज निर्माण करु अशी घोषणा केली. गेल्या पंधरा वर्षांपासून माझ्यासह कार्यकर्ते चळवळीत आहेत. संघर्ष करणे हे दैनंदिन जीवन झाले आहे तेच कार्य आता बहुजन दलित महासंघाच्या माध्यमातून आपण करणार आहोत यासाठी आपल्या सर्वांची साथ महत्त्वाची आहे.असे विचार व्यक्त केले.कार्यकमास तानाजी रणदिवे, बाळासाहेब मोहिते,संजय शेलार ,किरण माने,शैलेश मोहिते,रोहित अवघडे,उपस्थित होते. प्रास्ताविक सहदेव खंडागळे,यांनी केले तर आभार देवा लोंढे यांनी मानले.
0 Comments