'ठाकरे सरकारमधील १० मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार' - चंद्रकांत पाटील
मुंबई (कटूसत्य वृत्त):- विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहे. तर दुसरीकडे केंद्रीय तपास यंत्रणांनी ठाकरे सरकारमधील अनेक मंत्रांवर मंत्र्यांविरोधात कारवाई सुरू केली. या कारवाईवरून सरकारमधील मंत्रांनी केंद्रीय तपास यंत्रणेवर आरोप केले असून राजकीय विरोधकांची कोंडी करून त्यांना अडचणीत आणून या यंत्रणा भाजपच्या राजकारणाला हातभार लावतात. अशी टीकाही केली आहे. राज्य सरकारने देखील भाजपाच्या काही माजी मंत्र्यांवर कारवाईचे संकेत दिले आहेत.यावर आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले,'अनिल परब, नवाब मलिक यांच्यावर भाजपाकडून सातत्याने आरोप केले जात असतानाच येत्या काळात १० मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार' असं म्हणत पाटील यांनी खळबळजनक दावा केला आहे.
0 Comments