९०० जुनी मिल कामगारांच्या वारसदारांना ५० कोटींची जुनी मिलची जागा देणार - कुमार करजगी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जुनी मिल सन १९६३ साली बंद पडली, त्या मिलमध्ये काम करणाऱ्या गरीब कामगारांना त्यांच्या कष्टाचा पैसा सन १९८८ सालापर्यंत मिळाले नाही. गरीब कामगारांना त्यांच्या कष्टाचा पैसा मिळवून देण्यासाठी कामगार पुत्र कुमार करजगी यांनी सन १९८८ साली जुनी मिल बेकार कामगारवारसदार वजनहित संघर्ष समितीची स्थापना करून १० हजार कामगारांचे क्लेम्स २५ वर्षानंतर उच्च न्यायालयात दाखल करून न्यायालयीन संघर्ष करून गरीब कामगारांना त्यांच्या कष्टाचा पैसा मिळवून दिला. कामगारांना त्यांच्या कष्टाचा पैसा मिळवून देण्यासाठी उच्च न्यायालयातील जुनी मिलच्या जागेची किंमत वाढवण्यासाठी शहरातील प्रतिष्ठीत व्यक्तींच्या सहकार्याने योजना राबविण्यात आली. त्या योजनेमुळे शेकडो नागरिकांना अल्प किंमतीमध्ये जुनी मिल जागेतील प्लॉट मिळाले. त्यांना प्लॉट देवून माझ्याकडे जुनी मिलची अजून काही जागा शिल्लक आहे. ती जागा कामगारांच्या वारसाना त्यांची घरे बांधण्यासाठी देण्याचे मी ठरविले आहे. सन १९८८ साली मी सुरू केलेल्या संघर्ष लढ्यामध्ये जुनी मिल चाळ, जुनी पोलिस लाईन, धरमसी लाईन येथील कामगारांनी मला प्रचंड साथ दिली. म्हणूनच मी जुनी मिल कामगार संघर्ष लढा यशस्वी करू शकलो. आता जुनी मिलच्या जागेवर ९०० वारसदारांना त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचा मी संकल्प केला आहे. त्यासाठी जुनी मिल चाळ, जुनी पोलिस लाइन, धरमसी लाईन येथील गरीब जुनी मिलच्या वारसदारांनी जुनी मिल येथील ऑफिसमध्ये कुमार करजगीयांच्याशी संपर्क साधावा.
0 Comments