'2024 पर्यंत अमेरिकेच्या बरोबरीने..'; नितीन गडकरींचं मोठा प्लॅन
नवी दिल्ली (वृत्त सेवा):-गेल्या काही वर्षांपासून देशभरात रस्त्यांचं मोठं जाळ वाढलं आहे. अनेक राष्ट्रीय महामार्ग आणि ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रस्ते बनवण्यात आले आहेत. त्यातच आता संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी भारतातील रस्त्यांच्या विकासाबाबत माहिती दिली आहे. नितीन गडकरींनी बोलताना सन 2024 पर्यंतचा प्लॅन ऑफ अॅक्शन सांगितला आहे. भारतातील रस्त्यांचे जाळे आणि पायाभूत सुविधा या 2024 पर्यंत अमेरिकेच्या बरोबरीने करण्यात येतील. रस्ते सुरक्षासंदर्भात लोकांमध्ये अधिक जनजागृती करण्याची गरज असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. देशभरात राष्ट्रीय महामार्गांवर वाढणारे अपघात आणि महामार्गांसाठी रस्त्याचे रूंदीकरण ही केंद्र सरकारसाठी एक चिंतेची गोष्ट असल्याचं नितीन गडकरींनी म्हटलं आहे. देशात रस्ते अपघातांमध्ये तब्बल दिडलाखांपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडतात, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे. दरम्यान, देशातील अपघात कमी करण्यासाठी योग्य ती पावलं उचलण्यात येत आहेत. देशात रस्त्यांचं मोठं जाळ उभारणं ही मोठी समस्या नाही तर रस्ते उभारणी संदर्भातील तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल क्षेत्र, लोकांमधील जनजागृती आणि शिक्षण हे महत्त्वाचे मुद्दे असल्याचं नितीन गडकरी म्हणाले आहेत. 'मला वाटलं होतं राज ठाकरे हे करुच शकत नाही पण..' 'काही पक्षांचे विचार एक्सपायर झाले आहेत तरी.'; भाजपचा हल्लाबोल '. त्यानंतर नरेंद्र मोदी स्वतः पंतप्रधानपद सोडतील' 'भाडे दिले नाही तर.'; भाडेकरुसांठी सर्वोच्च न्यायालयानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 'सात अजुबे इस दुनिया में, आठवा अजुबा.'; भाजप आमदाराचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल.
0 Comments