सोलापुर पुणे महामार्गावर अपघात ,दोघांचा मृत्यु
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला दुसऱ्या एका मालट्रकने पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील यावली शिवारात सकाळी सात वाजता झाला. रोहित गुलबाके व मनोजकुमार गुलबाके दोघे ही रा. चांदोरा खुर्द जिल्हा बैतूल मध्य प्रदेश अशी मृतांची नावे आहेत. हा अपघात टोल नाका व्यवस्थापनाच्या त्रुटीमुळे झाल्याची चर्चा परिसरात होती.
मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मालट्रक क्र. आरजे 9/जीए 5505 ही पुण्याकडे निघाली होती. कुठलीही सूरक्षेची काळजी न घेता पार्किंग लाईट न लावता रस्त्याच्या कडेला उभी होती. त्याच वेळी मालट्रक क्रमांक एम एच 12 एस एक्स 4174 (MH 12 SX 4174)ही ही पुण्या कडे निघाली होती. समोरच्या उभ्या ट्रकने पार्किंग लाईट न लावल्याने तसेच दाट धुक्यामुळे पुढचे काहीही न दिसल्याने पुण्याकडे निघालेल्या दुसऱ्या मालट्रकने उभ्या असलेल्या मालट्रक ला पाठीमागून जोराची धडक दिली, त्यात वरील दोघेजण गंभीर जखमी होऊन जागीच मृत झाले.
ही घटना मोहोळ पोलिसांना समजताच त्यांनी दोन क्रेन बोलावून दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला केली व रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. तसेच मालट्रक मध्ये अडकलेले मृतदेह ही क्रेनच्या साह्याने बाजूला काढले. दरम्यान टोल नाका प्रशासन टोलवसुली करते मात्र तशा सोयीसुविधा प्रवाशांना मिळत नाहीत. अनेक ठिकाणचे पथदिवे बंद असतात, महामार्गावर गस्त घालणाऱ्या वाहनांचीही यात हायगय दिसून येते. थोड्या चुकीमुळे यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत व त्यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.या अपघाताची खबर अमर प्रभू डोंबे यांनी पोलिसात दिली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार अविनाश शिंदे करीत आहेत.
0 Comments