दूध संघाच्या निवडणुकीत राजन पाटलांची वाढली ताकत

म्हेत्रे यांना मात्र मतदारयादीतून वगळले
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या निवडणुकीपूर्वीच माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा मतदारयादीतून वगळले आहे. माजी आमदार राजन पाटील यांच्या ताब्यातील संस्थांची संख्या मतदारयादीत यावल्याने त्यांची ताकत वाढली आहे. म्हेत्रे हे सांगवीचे रहिवासी नसल्याने त्यांच्या नावावर आक्षेप घेण्यात आला होता. दूध संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आता ३१६ मतदार असणार आहेत. प्रारुप यादीवर दाखल झालेल्या दावे व आक्षेपांचा निकाल डॉ. कदम यांनी दिला आहे. या निकालातून ही माहिती समोर आली आहे. दूध संपाच्या आगामी निवडणुकीत माजी आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे यांची जोडी पॉवरफुल्ल होती. आता माजी आमदार राजन पाटील यांचीदेखील ताकद या निवडणुकीसाठी वाढल्याचे दिसत आहे. दुग्धचे विभागीय उपनिबंधक डॉ. महेश कदम यांनी हा आक्षेप मान्य करत म्हेत्रे यांचे नाव मतदार यादीतून वगळले आहे. मोहोळमधील दूध संस्थांनी दाखल केलेल्या हरकती ८१ हरकतींपैकी ४७ हरकती मान्य झाल्याने मोहोळमध्ये ४७ मतदार वाढले आहेत. दूध संघाच्या निवडणुकीसाठी पूर्वी २६३ मतदार पात्र ठरले होते. म्हो यांचे नाव कमी झाल्याने ती मतदार संख्या २६२ झाली असून त्यामध्ये ५४ नवीन मतदार वाढले आहेत. दूध संघासाठी नव्याने ५४ मतदार न्यावले असून, त्यात मोहोळमधील ४७ संस्थांचा समावेश आहे. दूध संघावर संचालक म्हणून न्येण्यासाठी माजीमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नावाचा ठराव सांगवी (ता. अक्कलकोट) येथील श्रीगणेश संस्थेतून झाला होता. नेत्यांच्या नावावर अन् गावावर धावणे, आवताडेंचे बोट माजीमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, बबनराव आवताडे, सुरेश हसापुरे, औदुंबर वाडदेकर, योगेश सोपल, रणजितसिंह शिंदे, प्रभाकर कोरे, दीपक माळी या नेत्यांचे गाव आणि दूध संघात येण्यासाठी त्यांनी ठराव केलेल्या संस्थेचे गाव यावदल आक्षेप घेण्यात आला होता. माजीमंत्री म्हो यांचा आक्षेप मान्य करून त्यांचे नाव मतदार यादीतून वगळले आहे. उर्वरित नेत्यांच्या विरोधातील आक्षेप फेटाळले असून त्यांची नावे मतदार यादीत कायम राहिली आहेत. दूध संघ बचावच्या माध्यमातून न्यायालयोन लवा देणारे डिकसळच्या (ता. मोहोळ) जगदंवा दूध संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब धावणे व विरवडे (ता. मोहोळ) येथील चंद्रभागा संस्थेचे चेअरमन अनिल अवताडे यांनी हे आक्षेप घेतले होते. दीपक माळी यांच्या नावावर केम (ता. करमाळा) येथील गोकूळ संस्थेच्या चेअरमन संगोता लोंढे यांनी आक्षेप घेतला होता. नेत्यांच्या नावावर आणि गावांवर धावणे, आवताडे, लोदे यांनी आक्षेपाच्या माध्यामातून बोट ठेवले. मतदार यादीसाठी प्रयत्न करणारी बचाय समिती दूध संघाच्या निवडणूक आखाड्यात उतरणार का? याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
0 Comments