पत्रकार सुरक्षा समिती वतीने पत्रकारदिन साजरा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पत्रकार सुरक्षा समिती वतीने सोलापुरात पत्रकारदिन साजरा करण्यात आला , दैनिक तुफान क्रांतीचे संपादक मिर्जागालिब मुजावर यांच्या हस्ते पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पत्रकारदिन साजरा करण्यात आला त्याचबरोबर पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी राज्यातील पत्रकारांच्या वेगवेगळ्या विषयांवर पत्रकार सुरक्षा समिती वतीने करत असलेले आंदोलन निवेदन उपोषण त्याचबरोबर पत्रकारांच्या विषयांवर राज्यसरकार कडे करत असलेल्या पत्र व्यवहारांची माहिती देऊन पत्रकारांच्या प्रश्नांवर पत्रकारांनी एकत्र येऊन संघर्ष केल्याशिवाय पत्रकारांचे प्रश्न सुटणार नाहीत , असे यावेळी नमूद करून राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नांवर पत्रकार सुरक्षा समिती यापुढे देखील आक्रमकपणे संघर्ष उभा करून पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यात येतील असे सांगितले , या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य सचिव डॉ आशिषकुमार सूना होते या कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष वैजिनाथ बिराजदार , जिल्हासंघटक दत्तात्रय पवार , जिल्हाउपाध्यक्ष्य सादिक शेख , जिल्हासचिव रिझवान शेख , जिल्हा प्रसिद्धीप्रमुख नागनाथ गणपा , पत्रकार सुरक्षा समितीच्या मार्गदर्शिका विजयश्री गुळवे , शहर अध्यक्ष राम हुंडारे महिला शहर अध्यक्ष नागमणी वग्गु शहर उपाध्यक्ष श्रीनिवास वंगा शहर संघटक श्रीकांत कोळी शहर सचिव प्रदीप पेद्दापल्लिवार शहर कार्याध्यक्ष अन्सार तांबोळी (BS) शहर प्रसिद्धी प्रमुख अक्षय बबलाद यासह युसुफ पिरजादे राजेंद्र काळे इस्माईल शेख रोहित घोडके सिध्दार्थ भडकुंबे योगेश स्वामी डॉ किर्तिपाल गायकवाड अरुण सिडगिद्दी भागप्पा प्रसन्न विवेकानंद खेत्री रवी मनहळी राहुल खानापुरे सिद्राम येलदी अशोक ढोणे सतीश गडकरी दत्तात्रय धनके अनिरुद्ध गायकवाड सूर्यकांत व्हनकडे शब्बीर मणियार अल्ताफ शेख बाबा काशीद प्रदीप स्वामी रवी विटकर अमोल लांडगे रघुवीर हत्तिकर दैनिक अबतकचे संपादक प्रसाद जगताप कार्यकारी संपादक कंपली इम्तियाज अक्कलकोटकर शिवसेना उपशहर प्रमुख धनराज (नाना) जानकर बिपिन दिड्डी अशोक माचन गिरीश गोसकी शशिकांत वन्नम मेहबूब बेपारी रियाज शेख प्रकाश वाळके अण्णा धोत्रे आदम बागवान विनोद धुमाळ गणेश देवमारे राजेंद्र पवार शंकर माने इत्यादी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे बहारदार व नियोजनबद्ध सूत्रसंचालन धसका न्यूज नेटवर्क च्या वृत्त निवेदिका आरती बबलाद यांनी अतिशय शिस्तबद्ध रित्या केले असून या कार्यक्रमाचे आभार बाबा काशीद यांनी मानले सदरचा कार्यक्रम कोरोनाचे सर्व नियम पाळून घेण्यात आला.
0 Comments