माढा शहरात रखडलेले राज्य मार्गाचे काम तातडीने सुरु करावे अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा.....
माढा (कटूसत्य वृत्त):- माढा शहरात रखडलेले यावली सालसे राज्य मार्गाचे काम तातडीने सुरु करावे अन्यथा २३ नोव्हेंबर ला माढ्यातील छत्रपती शिवाजीमहाराज चौकात शिवसेना स्टाईल ने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना शहराध्यक्ष शंभु साठे यांनी तहसील व सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलाय.माढा शहरामधून गेलेल्या यावली ते सालसे या राज्य मार्गाचे काम दोन वर्षापासून सुरु आहे मात्र ते अद्याप पर्यंत पुर्ण झालेले नाही.याबाबत माढा शिवसेनेने सातत्याने आंदोलने करून सुद्धा अजून पर्यंत पूर्ण झालेले नाही.श्री माढेश्वरी मंदीर ते रोकडोबा मंदिर तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक जवळ युवराज हॉटेल ,या परिसरातील पूर्णपणे काम अनेक दिवसांपासून बंद आहे.परिणामी वाढत्या धुळीमुळे हवा प्रदूषित होत आहे.याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ज्येष्ठ नागरिक महिला लहान मुले शाळेत जाणारी मुले यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो आहे. तसेच सध्या ऊस वाहतूक करणारी वाहने रस्त्याने ये जा करीत आहेत. लाईटचे पोल हे युवराज हॉटेल ते स्टेट बँक दरम्यान रस्त्यावरच उभ्या अवस्थेत आहेत.त्यावर लाईटची व्यवस्था केलेली नाही.त्यामुळे रात्रीच्या वेळेला रस्त्यावरील लाईट च्या तारा ट्रॅक्टरला घासुन जात असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.त्याचप्रमाणे रस्त्यावरील गटारीचे काम अपूर्ण आहे.त्यामुळेही दुर्गंधी सुटुन नागरिकांना त्याचा त्रास होत आहे.तसेच सदर मार्गावर वाहतूक वाढलेली असून अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे रस्त्यावर शाळेजवळ , गणपती मंदिर झेंडे गल्ली , तसेच साठे गल्ली पाराजवळ बालवाडी असल्यामुळे सदर ठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावेत.जेणेकरून अपघात होणार नाहीत.सदरची सर्व कामे तत्परतेने करावीत.अन्यथा २३/११/२०२१ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तहसील प्रशासन यांच्याविरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना स्टाईल आंदोलन करित रास्ता रोको केला जाणार असल्याचा इशारा निवेदनातुन देण्यात आलाय.यावेळी भैय्या खरात,गौतम शिंदे,आक्रम कुरेशी,बशीर आतार,आक्रम कुरेशी आदी उपस्थित होते.
0 Comments