Hot Posts

6/recent/ticker-posts

दिवाळीच्या पूर्वसंध्येला अनगर पंचक्रोशीला नगरविकास खात्याकडून अमूल्य भेट

 दिवाळीच्या पूर्वसंध्येला अनगर पंचक्रोशीला नगरविकास खात्याकडून अमूल्य भेट


अनगर नगरपंचायतीच्या स्थापनेचे अधिकृत आदेश
यापुढील काळातही विकासाची घोडदौड सुरूच राहणार 
राजन पाटील यांनी व्यक्त केले सर्वांचे आभार




मोहोळ (कटूसत्य वृत्त):-केवळ तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात एक आदर्शवत ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या गेलेल्या अनगर - कोंबडवाडी ग्रामपंचायतीचे आता अनगर नगरपंचायती मध्ये रुपांतर झाले असून यामध्ये ग्रामपंचायत खंडोबाचीवाडी, ग्रामपंचायत नालबंदवाडी, ग्रामपंचायत कुरणवाडी ( अनगर ) या तीन ग्रामपंचायतीच्या गावठाण आणि महसुली क्षेत्रांचा समावेश झाला आहे. या ग्रामपंचायतीची रीतसर रचना होऊन मुक्त नगरपंचायतीचे अधिकार व कर्तव्य पार पाडण्यासाठी शासकीय अधिकारी तथा प्रशासक म्हणून मोहोळचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांची नियुक्ती शासनाने केली आहे. ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा शासनाच्या नगरविकास विभागाने करत राज्यपालांच्या नावे प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून 1 नोव्हेंबर रोजी आदेश काढला आहे.
याबाबत काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी प्रशासनाने रीतसर प्रशासकीय कार्यवाही आणि सूचना प्रसिद्ध करून आक्षेप मागविले होते. याबाबत प्रशासकीय स्तरावर एकही आक्षेप न आल्याने अनगर नगरपंचायत स्थापन होण्याचा मार्ग यापूर्वीच सुकर झाला होता.
या शासन आदेश आणि निर्णयाची अधिकृत घोषणा आणि आदेशाची माहीती उपलब्ध होताच अनगरमध्ये माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील, अजिंक्यराणा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अनगर परिसरातील नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.
माझे मार्गदर्शक शरदचंद्र पवार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष सहकार्यामुळे आज अनगर ग्रामपंचायतीचे नगरपंचायती मध्ये रूपांतर झाल्याचा मनस्वी आनंद होत आहे. या पूर्वीपासूनची पंचक्रोशीच्या विकासाची अविरत घोडदौड नगरपंचायतीच्या माध्यमातूनही अशीच सुरू राहील असा मला विश्वास वाटतो. मोहोळचे आमदार यशवंत माने, बीडचे आमदार अमरसिंह पंडित, परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी केलेल्या प्रशासकीय पाठपुराव्यामुळेच हे शक्य झाले आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घोषित करून अनगर पंचक्रोशीला दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरा करण्याचा आनंद दिला आहे. त्यामुळे सर्व अनगरवासियांचे देखील मी अभिनंदन करून शुभेच्छा देतो.
राजन पाटील, माजी आमदार मोहोळ.

Reactions

Post a Comment

0 Comments