मोहोळ शहर आणि तालुक्यातील आठवडे बाजार सुरू करामोहोळ चेंबर्स ऑफ कॉमर्सची प्रशासनाकडे मागणी
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- ग्रामीण अर्थकारणाचा कणा असलेले आठवडा बाजार सुरु करावेत अशी मागणी मोहोळ चेंबर ऑफ कॉमर्सने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी डॉ. मिलिंद शंभरकर आणि मोहोळचे आमदार यशवंत माने आणि मोहोळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके यांच्याकडे स्वतंत्र निवेदनाद्वारे केली आहे.
मागील सात महिन्यापासून मोहोळ तालुक्यातील आठवडा बाजार कोरोनामुळे बंद आहेत.कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून आठवडा बाजारावर अवलंबून असणारे मेवामिठाई,कापड,किराणा,भाजीपाला विक्री करणारे,स्टेशनरी विक्रेते,यां गरीब समूहाचे अर्थचक्र विस्कळीत झाले आहे. बचत गट, बँका व पतसंस्थाचे कर्जाचे हप्ते व त्यावरील व्याजाच्या बोजात बाजारकरी दबून गेला आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थकारण संपूर्ण ठप्प झाले आहे. त्याचप्रमाणे कोरोनामुळे बंद असलेली मंदीरे,शाळा,बाजारपेठा सुरू केल्या आहेत,पण आठवडा बाजार मात्र पूर्णपणे बंद आहेत. यापुढील काळात मात्र आठवडा बाजार बंद ठेवणे अन्यायकारक आहे,म्हणून शासनाने आठवडा बाजार सुरू करण्याची परवानगी स्थानिक प्रशासनाला दयावी असे या निवेदनात म्हटले आहे.
मोहोळ तालुक्यातील आठवडा बाजार कोरोना विषयी सर्व नियम व अटी घालून चालू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी प्रशासनाला निवेदनाद्वारे चेंबर्स ऑफ कॉमर्स मोहोळ यांच्यामार्फत करण्यात आली आहे.
या निवेदनावर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रविण (नाना) डोके, सचिव हरीचंद्र बावकर, खज़िनदार महेश आंडगे,सदस्य अतुल गावडे शीतल कोळेकर,संतोष देशमुखे,आबासाहेब पेंडपाले,अभिजीत पिचके आदिंच्या सह्या आहेत.
0 Comments