Hot Posts

6/recent/ticker-posts

पक्ष मोठा बनवायचा असेल तर कार्यकर्ता मजबूत झाला पाहिजे-डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील

 पक्ष मोठा बनवायचा असेल तर कार्यकर्ता मजबूत झाला पाहिजे-डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील


मोहोळ (कटूसत्य वृत्त):-पक्ष मोठा बनवायचा असेल तर कार्यकर्ता मजबूत झाला पाहिजे, यासाठी आवर्जून काँग्रेस कार्यकर्ता जनसंपर्क दौरा आयोजित केला असून येणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. नवीन युवा कार्यकर्त्यांना यानिमित्ताने संधी देण्याचा मानस असून जिल्ह्यातील युवाशक्ती नी काँग्रेसच्या माध्यमातून राजकीय क्षेत्राची सुरुवात करावी, असे प्रतिपादन काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी केले.
मोहोळ येथील हॉटेल शुभम सभागृहात नूतन जिल्हाध्यक्ष  डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांचा काँग्रेस कार्यकर्ता जनसंपर्क दौरा पार पडला. यावेळी मोहिते पाटील बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाने सोलापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये मोठे योगदान दिले आहे. भविष्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष झालेचे पाहायला मिळेल. काँग्रेस पक्ष एक विचारधारा आहे त्यामुळे विचारधारा कधी संपत नसते, त्यामुळे प्रतिकूल परिस्थिती मध्येही काँग्रेस सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात पुढे असेल, असा विश्वास ही या वेळी मोहिते पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष शाहीन शेख म्हणाल्या की, कार्यकर्ता तयार करण्याचा कारखाना म्हणून मोहिते पाटील यांच्याकडे पाहिले जाते. जिल्ह्यात सध्या कॉंग्रेसचा एक आमदार आहे, मात्र धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह जास्तीत जास्त आमदार येतील, असा आशावाद असल्याचेही यावेळी महिला जिल्हाध्यक्षा शाहीन शेख यांनी सांगितले.
यावेळी शहराध्यक्ष पोपट कुंभार, तालुकाध्यक्ष अशोक देशमुख यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
यावेळी महिला जिल्हाध्यक्ष शाहीन शेख, तालुकाध्यक्ष अशोक देशमुख, ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, कार्याध्यक्ष सुरेश शिवपूजे, वसीम पठाण, जिल्हा सरचिटणीस किशोर पवार, शहराध्यक्ष ऍड. पोपट कुंभार, प्रकाश जवंजाळ, संजय आठवले, रशीद पठाण, स्वामी, गुंड पाटील, अमजद शेख, कांतीलाल राऊत, बिरा खरात, संतोष शिंदे, सूत्रसंचालन नागेश साळुंखे यांनी तर आभार संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.



Reactions

Post a Comment

0 Comments