प्रबुद्ध व्यायामशाळा येथे लाइट फिटिंग व व्यायाम साहित्य
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांच्या निधीतून प्रबुद्ध व्यायामशाळा येथे लाइट फिटिंग व व्यायाम साहित्य भेट देण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रभाग क्रमांक १५च्या नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे व सामाजिक कार्यकर्ते जॉन फुलारे यांच्या हस्ते व सामाजिक कार्यकर्ते विश्वास नागटिळक यांच्या अध्यक्षतेखाली व अनिल आठवले, बाबा वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थित हा उद्घाटनाचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी अविनाश गायकवाड, लतीश लोकरे, बप्पू मस्के, रोहन सूर्यवंशी, अमर गायकवाड, अभिजित आठवले, राकेश हाडमोडे, प्रयास गायकवाड, अक्षय देवल्लू, रोहन हाडमोडे, विकास कांबळे, चंद्रमणी मागाडे, दीक्षांत कांबळे, महेश चलवादी, कीर्तिपाल जानराव, निशांत कसबे यांच्यासह प्रबुद्ध सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते व बुद्धनगर फॉरेस्टमधून युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. आभार प्रबुद्ध संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागर शेंडगे यांनी मानले.
0 Comments