थेऊर फाटा ते थेऊर गाव या ठिकाणी मनसेच्या वतीने श्राद्ध घालून आंदोलन करण्यात आले
हवेली (कटूसत्य वृत्त):- थेऊर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्राद्ध घालून अनोखे आंदोलन करण्यात आले. थेऊर फाटा ते थेऊर गाव या पाच किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी अर्धा तासाचा अवधी लागत आहे. तसेच रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असेच चित्र पाहावयास मिळत आहे. रस्त्यावरील धुळीने नागरिक त्रस्त झाले आहेत. चार वर्षापूर्वी अष्टविनायक विकास आराखड्याअंतर्गत तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या काळात पुणे सोलापूर महामार्ग थेऊर फाटा ते लोणीकंद पुणे-नगर महामार्ग या रस्त्यासाठी 165 कोटी निधी मंजूर झाला होता. तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले होते दोन वर्षापासून या रस्त्याचे काम रखडले आहे. या रस्त्यावरती बरेच छोटे मोठे अपघात दररोज घडत असतात आत्तापर्यंत या रस्त्यावरती काही जणांना प्राणही गमवावे लागले आहेत. आणि काही जणांना अपंगत्व आले आहे. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदाराचा निषेध करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका संघटक काकासाहेब गायकवाड यांनी लवकरात लवकर रस्त्याचे काम चालू करा अन्यथा मनसे स्टाईलने "खळ आणि खट्याळ" आंदोलन केले जाईल असा इशारा दिला यावेळी रामचंद्र गायकवाड हवेली तालुका संघटक, ॲड. राहुल कदम पुणे जिल्हा अध्यक्ष जनहित व विधी विभाग, संदीप नाळे उप अध्यक्ष, सीमाताई काकडे हडपसर उपविभाग अध्यक्ष, अनिकेत मुळीक उपाध्यक्ष हवेली, रोहित पुजारी, सागर गायकवाड, राहुल राजगुरू वैभव गावडे, प्रशांत खांडे, विशाल पवार, रोहित सोनवणे, शुभम लटके, राहुल राजगुरू, आप्पा चौधरी, बापू गुंजाळ, अक्षय जोशी, सुमित गायकवाड, संदीप चोरघडे, आदी उपस्थित होते.
0 Comments