इथेनॉलच्या इंजिनलाच वाहतुकीस परवानगी या केंद्राच्या निर्णयाचे स्वागत आ.बबनदादा शिंदे
विठ्ठल कॉर्पोरेशन लि.कारखान्याचा चौदावा गळीत हंगामाचा शुभारंभ
कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी भविष्यात डिझेल ऐवजी इथेनॉल वर चालणारी इंजिन यांनाच वाहतुकी करिता परवानगी देण्याचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले असून गव्हर्मेंटने जर इथेनॉल निर्मितीस प्रोत्साहन देऊन असा निर्णय घेतला तर कारखान्या समोर पंप टाकून वाहतूक यंत्रणांना इथेनॉलचा पुरवठा केला जाईल व त्या उत्पन्नापासून उसास वाढीव दर देण्यासही सोईस्कर होईल,डिझेल दरवाढीमुळे पूर्वीच्या वाहतूक दरापेक्षा आताच्या वाहतूक खर्चात वाढ होत आहे व सदर डिझेल दरवाढीचा फरक वाहतूकदारांना देणार असल्याचे आ. बबनदादा शिंदे यांनी प्रतिपादन केले.म्हैसगाव येथील विठ्ठल कॉर्पोरेशन लि. कारखान्याचा चौदावा गळीत हंगामाचा शुभारंभ माढ्याचे आ.बबनदादा शिंदे यांच्या हस्ते व करमाळ्याचे आ.संजयमामा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ.शिंदे हे बोलत होते.यावेळी माजी आ.विनायकराव पाटील पोपटभाऊ गायकवाड, वामन भाऊ उबाळे, सुहासकाका पाटील, भरतबाबा पाटील,विलास पाटील, महादेव उबाळे,राजेंद्र बारकुंड,आप्पासाहेब उबाळे, सुरेश मारुती बागल,बाबुराव शिरसागर, दासू जाधव,प्रवीण पाटील,विजय पाटील,व्यंकटेश पाटील,सुजित बागल,मानसिंग उबाळे,धर्मा गायकवाड,शहाजी पाटील,मधुकर पाटील,सर्जेराव बागल,संभाजी डूकळे,पांडुरंग शिंदे,परमेश्वर श्रीराम, तानाजी फडतरे,पंडित खारे,सुरेश बागल,भारत गाडे,राजेश गांधी,दत्ता काकडे,आनंद टोणपे,चंद्रकांत वाघमारे,नितीन पवार,अमीर मुलाणी,आशिष रजपूत,अरुण काकडे,,बंडू भोसले,रंगनाथ माळी,धनंजय मोरे,गणेश बागल,राजेंद्र केदार,बाळासाहेब जगदाळे,चंद्रशेखर गोटे,शशिकांत माळी,सुशील गायकवाड आदी उपस्थित होते.पुढे बोलताना ते म्हणाले की वाढीव ऊस दराची एफआरपी आदा करण्यासाठी साखरेची एमएसपी प्रति क्विंटल ३१०० रुपये ऐवजी ३५०० रुपये प्रमाणे केंद्र सरकारने केल्यास सर्व प्रश्न सुटतील असे नमूद करीत साखर कारखान्याचे उत्पन्न व खर्च याचा आराखडा त्यांनी मांडला.वीजनिर्मिती रॉ मटरेल इथेनॉल निर्मिती यामधून कारखान्यास प्रतिटन ५०० ते ५५० रुपये मिळतात ज्यादा परंतु आजच्या या परिस्थितीमध्ये १०० ते १५० रुपये प्रति टनास अदा करण्यास कमीच पडतात खऱ्या अर्थाने जर साखर उद्योग यशस्वी करायचा असेल तर साखर किंमत वाढणे अत्यंत गरजेचा आहे,साखर किंमत वाढवणे करिता नॅशनल फेडरेशन इंडियन शुगर मिल असोशियन दिल्ली,वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन पुणे, साखर आयुक्त या सर्वांनी पाठपुरावा करून शिफारस केली आहे.याकरिता देशाचे नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितींजी गडकरी व राज्य सरकार यांचेदेखील सहकार्य लाभत आहे हे अग्रक्रमाने प्रयत्न करीत असल्याचे ही आ.शिंदे यांनी सांगितले.केंद्र सरकारने साखरेच्या एमएसपी वाढविण्या बाबतीत गांभीर्याने विचार करून ठोस निर्णय घेण्याचे गरजेचा आहे अशी प्रतिक्रिया आमदार बबनदादा यांनी व्यक्त केली,यावेळी आमदार बबनदादा आणि सर्वांना करुणा मुक्त दिवाळी करिता शुभेच्छा दिल्य.यावेळी अध्यक्षीय स्थानावरून बोलताना करमाळ्याचे आ.संजयमामा शिंदे यांनी येणारे हंगाम कारखानदारीच्या दृष्टीने दिलासादायक असून मागील तेरा गाळप हंगामात एकूण २३५ कोटी रुपये रक्कम एफआरपी पेक्षा ज्यादा कारखान्याने आदा केल्याचे सांगितले या गाळप हंगामात देखील जास्त एफआरपी देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला,कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस ८.३३ टक्के देणार असल्याचे ही आ.शिंदे यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यकारी सल्लागार एच.बी.डांगे यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिवव्याख्याते हर्शल बागल यांनी मानले.
0 Comments