मोहोळ तालुक्यातील दिव्यांगांच्या सर्वांगीण सुविधांसाठी शासन प्रयत्नशील

आ.यशवंत माने यांची ग्वाही; मोहोळमध्ये १६२ दिव्यांगांना शिधापत्रिकांचे वाटप
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्यातील शासनाची दिव्यांग साठीची अंत्योदय योजना असून दिव्यांगांना अंत्योदय योजनेत सामावून घेऊन स्वतंत्र शिधापत्रिका मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाचा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग सुरवातीपासुन प्रयत्नशील आहे. महाविकास आघाडी सरकारने तळागाळातील सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत असे प्रतिपादन मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी केले.मोहोळचे तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांच्या संकल्पनेतून मोहोळ तहसील प्रशासनाच्या वतीने मोहोळ तालुक्यातील दिव्यांगासाठीच्या शिधीपत्रिका वाटप शिबिराचे शिबीराचे उदघाटन मोहोळचे आमदार यशवंत(तात्या)माने यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी आमदार यशवंत माने बोलत होते.
या शिबिरामध्ये तब्बल १६२ दिव्यांगांना आमदार माने यांच्या हस्ते शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले.यावेळी तहसीलदार प्रशांत बेडसे - पाटील ,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे,संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष सज्जन पाटील,हणुमंत पोटरे,गटविकास अधिकारी गणेश मोरे,नायब तहसीलदार लिना खरात, नायब तहसीलदार भालचंद्र यादव, दिव्यांग संघटनेचे प्रतिनिधी मनोज धोत्रे यांच्यासह मोहोळ महसूल प्रशासनातील आणि पुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचारी आणि दिव्यांग बांधव उपस्थित होते.
0 Comments