मोहोळच्या संजय गांधी निराधार समितीची पहिली सभा आज संपन्न
मोहोळ ( कटूसत्य वृत्त):- आज मोहोळ येथे संजय गांधी निराधार योजना समिती नुतन सदस्याची पहिली सभा सचिव तथा मोहोळचे तहसीलदार प्रशांत बेडसे -पाटील यांच्या दालनात आज समितीचे अध्यक्ष सज्जन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या सभेमध्ये एकूण ४० प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. काही नाममात्र त्रुटी असलेल्या अठरा प्रकरणाच्या त्रुटी दूर करून पुढील बैठकीत ठेवण्याचे ठरले. अध्यक्ष सज्जन पाटील समितीचे सदस्य यशोदाताई कांबळे,बाळासाहेब वाघमोडे,मुकुंद पाटील,प्रशांत बचुटे,संतोष चव्हाण,आशिष आगलावे,संजय देशमुख,रफिक तांबोळी,गौरव खरात व गटविकास अधिकारी गणेश मोरे आदी उपस्थित होते.
प्रशासनाच्यावतीने सर्वांचे सचिव तथा तहसीलदार प्रशांत बेडसे - पाटील यांनी स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या संजय गांधी निराधार योजना सभेमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन अनुदान योजना राष्ट्रीय गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग योजना आदी योजनांची सर्व सदस्यांना माहिती देण्यात आली व याविषयीचे आलेले अर्ज मंजूर करण्यात आले याव्यतिरिक्त समितीच्यावतीने मोहोळ तालुक्यातील अन्य पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रासह आपले अर्ज महा-ई-सेवा केंद्रातून दाखल करावेत अर्ज दाखल करताना कोणत्याही प्रकारचे अडचण असल्यास तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना कार्यालयाशी संपर्क साधा असे आवाहन सचिव प्रशांत बेडसे - पाटील यांनी केले. संजय गांधी निराधार समिती योजनेचा अर्ज करण्याची प्रक्रिया ही अत्यंत साधी सोपी असून लाभार्थ्यांनी कोणत्याही दलालांशी अथवा मध्यस्थाची संपर्क करू नये. त्या त्या गावातील तलाठी कार्यालयाशी संपर्क साधून पात्र लाभार्थ्यांनी आपले अर्ज महा-ई-सेवा केंद्रातून दाखल करावेत.असे आवाहन समितीचे सदस्य व राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रशांत बचुटे यांच्यासह सर्व नूतन सदस्यांनी केले.
0 Comments