Hot Posts

6/recent/ticker-posts

गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या चौकशी आश्वासनानंतर तात्पुरती स्थगिती

 गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या चौकशी आश्वासनानंतर तात्पुरती स्थगिती



दहा दिवसात कारवाई न झाल्यास अकराव्या दिवसापासुन आमरण उपोषण करणार

सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला तालुक्यातील वाढेगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक ,सरपंच यांनी मनमानी कारभार करून शासकीय अनुदान हडप करून वाढेगाव येथे निकृष्ट दर्जाची कामे करून जनतेची व शासनाची दिशाभूल करून फसवणूक केल्याबाबत वाढेगाव ग्रामस्थ गणेश महादेव शिनगारे यांनी या संबंधित चौकशीसाठी गट विकास अधिकारी यांना तक्रारी अर्ज देऊन देखील कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्या मुळे 21 ऑक्टोंबर पासून पंचायत समिती सांगोला कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते त्यानंतर 22 ऑक्टोंबर रोजी गट विकास अधिकारी आनंदजी लोकरे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत त्यामुळे उपोषण करता गणेश शिनगारे यांनी त्यांच्या आमरण उपोषणाला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे असे सांगितले. तसेच 10 दिवसांमध्ये चौकशी होऊन संबंधितावर ती कारवाई न झाल्यास पुन्हा अकराव्या दिवशी ग्रामस्थांच्यावतीने उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचेही गणेश शिनगारे यांच्याकडून सांगण्यात आले . यावेळी उपोषण घटनास्थळी शेकापचे नेते चंद्रकांत दादा देशमुख ,सभापती राणीताई कोळवले ,उपसभापती नारायण जगताप उपस्थित होते. वाढेगाव मधील ग्रामपंचायत मार्फत चौदाव्या वित्त आयोगाचे नुसार ग्रामसेवक, सरपंच यामध्ये संगणमत करून ठेकेदाराची नावे खोटी नमूद करून निकृष्ट दर्जाची कामे करून शासनाचे अनुदान हडप केले आहे .अंडरग्राउंड पाईपलाईनचे काम असताना पाईपा न पुरताच शंभर उघडे ठेवून सदरच्या पाईप काही ठिकाणी उघड्या ठेवलेल्या आहेत. त्यामुळे गावात मलेरिया डेंगू यासारखे रोग होऊन लोक मरत आहेत. फेवरब्लॉक रस्त्याचे काम कधी शेन उत्कृष्ट दर्जाचे असून शासकीय इस्टिमेट प्रमाणे नियमाप्रमाणे काम केलेले नाही तसेच गावातील सरपंच यांनी सदर बिले काढण्याकरिता पंचायत समितीमधील अधिकार्‍यांशी संगनमत करून त्यांना लाच देऊन बिले काढून हडप करीत आहेत.वर नमूद केल्याप्रमाणे इतर कामाबाबत सुद्धा वेळोवेळी पंचायत समिती कार्यालयात व गट विकास अधिकारी सांगोला जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी अर्ज दिलेले आहेत तथापि सदरचा सरपंच हा सर्व अधिकाऱ्यांना हाताशी धरून व ग्रामसेवकाला हाताशी धरून बिले स्वतः काढून घेत आहेत .त्यामुळे सदर प्रकरणी त्वरित चौकशी होऊन सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर गुन्हे दाखल करून त्वरित कायदेशीर कारवाई करावी यासाठी वाढेगावचे ग्रामस्थ गणेश महादेव शिनगारे यांनी सांगोला पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण 21 ऑक्टोंबर रोजी पासून सुरू करण्यात आले होते .वरील गणेश शिनगारे यांच्या मागणीनुसार गट विकास अधिकारी यांनी 22 ऑक्टोंबर रोजी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिनगारे यांच्या आमरण उपोषणाला तात्पुरती स्थगिती देण्यात आले आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments