ई पिक पाहणी ॲपबाबत प्रात्यक्षिकाद्वारे कृषीदूताकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
कुर्डुवाडी (कटूसत्य वृत्त):- डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित कृषी महाविद्यालय कोंघारा येथील कृषिदूत व तडवळे(म) ता.माढा येथील गणेश राजाराम परबत यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत ई-पीक पाहणी ॲपची माहिती देत पीक नोंदणी कशी करायची याचे प्रात्यक्षिकाद्वारे तडवळे व वाघेगव्हाण येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ॲप डाऊनलोड करणे, मोबाईल क्रमांक टाकून जिल्हा, तालुका निवडणे, पिकांची माहिती भरणे, खाते क्रमांक, गट क्रमांक, हगांम, पिकांचा वर्ग निवडणे,पिकाचे नाव,जलसिंचनाचे साधन, लागवडीचा दिनांक, पिकाचे छायाचित्र काढताना जीपीएस, स्थान निवडणे या संपुर्ण ई - पिक पाहणीच्या प्रक्रियेचे शेतकऱ्यांना मोबाईलच्या माध्यमातून शेतातील पिकाची नोंद करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. याप्रसंगी विश्वनाथ परबत, बालाजी परबत, सिद्धेश्वर परबत, सचिन चव्हाण,रमेश लुंगसे, किरण चव्हाण, सौदागर गायकवाड, शंकर चव्हाण, प्रवीण चव्हाण यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. कृषी दूत गणेश राजाराम परबत यांना महाविद्यालयाचे प्राचार्य महेश राठोड, कार्यक्रम अधिकारी प्रा.विशाल भाकडे, प्रा.शुभम शिरपूरकर, प्रा. दत्ता जाधव, प्रा. काजल माने, प्रा. गायत्री इंझाळकर प्रा.हेमंत वानखेडे, प्रा. अजय सोळंकी, प्रा.पल्लवी येरगुडे, प्रा.स्नेहल आत्राम यांचे मार्गदर्शन लाभले.
0 Comments