शासनाने भूमिहीन शेतमजुरांना दिलेल्या शेतजमिनीवर अनेकांनी मारला डल्ला
अज्ञान आणि आर्थिक असहायतेचा फायदा घेवून बेकायदेशीर जमिनी घेणाऱ्या विरोधात सामाजिक संघटना आक्रमक
सोलापूर (कटुसत्य):- सांगोला तालुक्यातील अनुसूचित जातीतील भूमिहीन शेतमजुरांना,माजी सैनिकांना शासनाने कसायला दिलेल्या जमिनीवर सांगोला तालुक्यातील धनदांडग्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून जमिनी बळकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. अशा जमिनी कवडीमोल किंमतीला खरेदी करून नावावर करून घेतल्या आहेत.त्यामुळे अनेक सामाजिक संघटना मागील दहा वर्षातील जमिनीचे खरेदी दस्तांची चौकशी करून अशा धन दांडग्यांना आणि जमिनी घेवून देणाऱ्या एजंटा विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचा इशारा सामाजिक संघटनांनी दिला आहे.राज्य शासनाने महाराष्ट्र सिलिंग ऍक्ट या कायद्यानुसार जे भूमिहीन शेतमजूर ,माजी सैनिक आहेत,त्यांना जमिनी भोगण्यासाठी दिलेल्या आहेत,त्यांचा समावेश भोगवटदार दोन मध्ये होतो.त्या जमिनी सांगोला तालुक्यातील आचकदाणी,सोनलवाडी,बागलवाडी, लोटेवाडी, लक्ष्मीनगर, खवासपूर, आदि गावातील भागात असून या भागातील आर्थिक असाह्य असलेल्या या मूळ जमीन मालकांना पैशाचे अमिष दाखवून,त्यांना एकटे गाठून,त्यांच्या अज्ञान पणाचा फायदा घेवून आणि त्यांना निर्जन स्थळी एकटे गाठून ज्यादा पैशाचे आमिष दाखवून,त्यांना दारू पाजून जवळपास शंभर एकराच्या वर या जमिनी मूळ मालकांच्या ताब्यातुन कोऱ्या स्टॅम्पवर आणि वारसांना कोणतीही पूर्व कल्पना न देता एजंटानी आणि काही राजकीय पुढाऱ्यांनी,ठेकेदारांनी या जमिनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने स्वतःच्या नावावर करून घेतल्या आहेत. भोगवटदार वर्ग दोन असलेल्या या जमिनीची परवानगी घेवून खरेदी घेण्याची प्रक्रिया किचकट असताना या धंनदाडग्यांनी बळकाविलेल्या या जमीनी च्या मूळ मालकांच्या वारसांना अचानक उताऱ्यावरची नावे उडाल्याने मूळ मालकांच्या वारसांची झोप उडाली आहे. लवकरच अशा जमिनी खरेदी करणाऱ्या एजंट आणि नवीन जमीन मालकांच्या विरोधात लवकरच जन आंदोलन करणार असल्याचा इशारा अनेक सामाजिक संघटनांनी दिला आहे. अशा भूमिहीन आणि अन्याय झालेल्या शेतकऱ्यांना दैनिक कटुसत्य आणि वृत्तदर्पण न्यूज चॅनेल वाचा फोडणार आहे.
0 Comments