रोटरी क्लब सांगोला च्या वतीने जागतिक पोलिओ दिनानिमित्त सांगोला शहरातून भव्य मोटर सायकल व कार रॅली
सांगोला (कटुसत्य):- 24 ऑक्टोबर या जागतिक दिनी पोलिओ निर्मूलनाचा रोटरी क्लबचा खूप मोठा सहभाग असतो आणि त्यादिवशी जनजागृती व्हावी म्हणून अशा प्रकारचे प्रत्येक वर्षी रोटरी क्लब रॅली काढत असते. असे जवळपास सगळ्या देशातून उच्चाटन करण्यामध्ये रोटरीने सहभाग घेतलेला आहे. केवळ पाकिस्तान व अफगाणिस्तान या देशांमध्ये पोलिओ मागे राहिला आहे. आणि त्या दिवसाची माहिती व्हावी व लोकांना महत्त्व पटावे म्हणून जनजागृती रॅली काढलेली आहे. यादरम्यान महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, पंडित जवाहरलाल नेहरू, अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर, डॉ. भीमराव आंबेडकर या महापुरुषांच्या पुतळ्यास रोटरी सदस्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.सकाळी 9 वाजल्यापासून मोटर सायकल व कार रॅलीला सुरुवात करून 10 वाजता रॅलीचा चहा पानानंतर सांगता समारोप करण्यात आला.
यावेळी रोटरी क्लब चे माजी अध्यक्ष रो. संतोष भोसले, रो दीपक चोथे, रो. इंजि.हमीद शेख, रो. सुरेश माळी, रो, डॉ, अनिल कांबळे, रो डॉ. प्रभाकर माळी,रो. महेश गवळी, रो.श्रीपती आदलिंगे सचिव, रो.विजय म्हेत्रे अध्यक्ष, रो. डॉ.संतोष पिसे रो. इंजि. विलास बिले, रो. दत्तात्रय पांचाळ, रो. धनाजी शिर्के, रो. नागेश तेली, रो. डॉ. पांडुरंग गव्हाणे, रो अॅड. सचिन पाटकुलकर,रो.निसार इनामदार गुरुजी,रो.बाळासाहेब नकाते, रो. सदाशिव पुजारी, रो. अरविंद डोंबे गुरुजी, रो.महाजन भाऊसाहेब,रो. जगताप गुरुजी आदि रोटरी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments