उत्कर्ष विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप

सांगोला (कटूसत्य वृत्त):- माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संचलित उत्कर्ष विद्यालयात गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. रमेश गरवारे चॅरिटी ट्रस्ट पुणे व माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना 100 हर्क्युलस सायकली संस्था अध्यक्षा मा. संजीवनी केळकर यांच्या हस्ते देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुनील कुलकर्णी सर यांनी विद्यालयात सुरू असलेले उपक्रम व संस्थेने दिलेल्या भौतिक सुविधा तसेच कोविड काळात गरजू विद्यार्थ्यांना नवीन मोबाईल, शिक्षकांसाठी Tab, वर्गनिहाय अँड्रॉइड टीव्ही, इयत्ता आठवी ते दहावी साठी सुरू केलेले मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स, सोलर प्रकल्पाविषयी माहिती सांगितली. इतर कोठेही उपलब्ध नसलेल्या वरील सुविधा संस्थेने उपलब्ध करून दिल्या आहेत. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या संजीवनी केळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना 'यशाकडे अखंड झेप घ्यायची' हा संदेश दिला.सदर कार्यक्रमास संस्था कोषाध्यक्षा डॉ. शालिनी कुलकर्णी, उपाध्यक्षा माधवी देशपांडे मॅडम, वसुंधरा कुलकर्णी तसेच आजी माजी मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवि कुंभार सर यांनी केले व आभार गौरी मिसाळ मॅडम यांनी मानले.
0 Comments