Hot Posts

6/recent/ticker-posts

आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त मोहोळ शहरात तब्बल दोनशे बावन्न जणांचे भव्य रक्तदान

 आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त मोहोळ शहरात तब्बल दोनशे बावन्न जणांचे भव्य रक्तदान



लखन भाऊ कोळी युवामंच यांचा आदर्श उपक्रम


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- अनावश्यक खर्चाला फाटा देत दरवर्षीप्रमाणे यंदाही मोहोळ शहरात आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त लखन भाऊ कोळी युवा मंचच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिर पार पडले. या रक्तदान शिबिरांमध्ये तब्बल २५२ रक्तदात्यांनी उस्फूर्तपणे आपला प्रतिसाद नोंदवत रक्तदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सेवानिवृत्त मंडलाधिकारी जगदीश कोळी यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना भेटवस्तूचे वाटप देखील यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित करण्यात आले.  यावेळी डॉ.सुधाकर गायकवाड, डॉ. संग्राम गायकवाड, डॉ. वसीम शेख,मोहोळ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रविण नाना डोके, अनंता नागणकेरी, डॉ. जयप्रकाश मोहिते, महेश माने, राजूभाऊ कोळी इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी प्रास्ताविक करताना या रक्तदान शिबिराचे संयोजक युवा सामाजिक कार्यकर्ते लखन भाऊ कोळी म्हणाले की दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्धार आमच्या युवा मंचच्या वतीने करण्यात आला होता. हे सर्व उपक्रम पार पाडण्यासाठी मोहोळ शहरातील सर्व मित्र परिवार आणि युवा मंचच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. असल्याचे आवर्जून या वेळी लखन कोळी यांनी नमूद केले हे सर्व उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी दिपक कांबळे, पंकज कांबळे,भैय्या गायकवाड,पप्पू कोळी,गुरुनाथ चव्हाण, जनार्दन माळी, नागेश चव्हाण, मयूर कोळी, सिकंदर शेख, जाकीर शेख, बंडू भानवसे,माऊली कोळी,नागेश चव्हाण, जावेद शेख, आकाश हनुमंते, नवाब कोळी, संतोष कोळी, विष्णू गोडसे, लक्ष्मण घाडगे, विकी पवार, प्रदीप घोडके, बंडू भानवसे, इम्रान पटेल,सुदामा शिंगाडे, बापू सरवदे,विनोद कोळी, मंगेश सावंतराव, सुरज माने, नरेश सावंतराव, नागनाथ सरवदे, महेश मोरे,विकी कोळी, अजय कावरे,रोहित लांबोरे ,सोमा कोळी, प्रेम सरवदे, अप्पा सरक -पाटील, नागेश गोरवे,नवनाथ कोळी, मोरया चंदीले, आकाश माने, खंडू लवटे, मोईन शेख, विष्णु गोडसे, रवी महामुनी, नागेश भांगे, आशिष खरात, दिलीप लांबोरे ,दिलीप खंदारे, बालाजी माने, राजू चव्हाण, योगेश फाळके, माऊली कोळी, नवनाथ घोडके, महेश गोरवे, रमेश शिंदे, दिलीप मडीखंबे, सूरज चव्हाण, नागनाथ घोडके, निखील मोरे, सत्यवान लेंगरे, वजीर शेख, उज्वल वाघमारे, गणेश व्हनमाने,मनोज कोळी, शुभम कोळी, चंद्रकांत भांगे, राजु भांगे ,आदित्य चव्हाण ,आशिष केवळे, सागर मेटकरी, इरफान मिर्झा, अफसर मुजावर,दादाभाई मुलांणी, बाळु कोळेकर इत्यादीसह लखन भाऊ कोळी युवा मंचचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.सध्या सुरू असलेल्या कोविड सारख्या आव्हानात्मक परिस्थितीत रक्ताची गरज सर्वांनाच आहे. ही बाब ओळखून आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिर यशस्वी करण्याचा संकल्प आमच्या युवा मंचच्या वतीने करण्यात आला. अभूतपूर्व प्रतिसाद मिळत हे रक्तदान शिबिर यशस्वी झाले आहे. या शिबिरांमध्ये तब्बल २५२ युवकांनी रक्तदान करून माणुसकीचे भान जपले आहे. यापुढील काळातही असे आदर्शवत उपक्रम राबवून आमचा युवा मंच सामाजिक कार्यात भरीव योगदान देणार आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments