Hot Posts

6/recent/ticker-posts

तालुक्यातील एकही गाव पाण्यावाचून वंचित राहणार नाही-मंत्री गुलाबराव पाटील सांगोला येथे आमदार शहाजी बापू पक्तही यांचा जंगी सत्कार संपन्न

 तालुक्यातील एकही गाव पाण्यावाचून वंचित राहणार नाही-मंत्री गुलाबराव पाटील सांगोला येथे आमदार शहाजी बापू पक्तही यांचा जंगी सत्कार संपन्न



                                                 

सांगोला (कटूसत्य वृत्त):-सांगोला तालुक्याचा कायमस्वरूपी दुष्काळ हटवण्यासाठी सिंचनाच्या विविध योजना मार्गी लावण्यासाठी सहकार्य करू, बापू तुमच्या पाठीशी विकास कामाच्या बाबतीत मी उभा आहे अशी ग्वाही देऊन येत्या कालावधीत सुद्धा सांगोला तालुक्याच्या सर्वांगीन विकासासाठी मी सहकार्य करणार असल्याची ग्वाही पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगोला येथ दिली सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार शहाजीबापू पाटील यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यकर्ता मेळावा आणि सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील, डीवीपी उद्योगसमूहाचे अभिजीत पाटील, सांगोला नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी सी झपकेे रफिक नदाफ शिव सेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, भाऊसाहेब रुपनर  कमरुद्दीन खतीब,प्राध्यापक संजय देशमुख, सागर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते शिवसेने मध्ये सामाजिक कामांना नेहमीच प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच आज एक टपरीवाला शिवसेनेच्या माध्यमातून मंत्री होतो. राजकारणात कोणाला पाणी पाजायचे असेल तर आपल्याकडे पाणी असावे लागते. बापू, तुम्ही काळजी करू नका, हा पाणीपुरवठा मंत्री तुमच्या पाठीशी आहे. तालुक्‍यातील एकही गाव पाण्यावाचून वंचित राहणार नाही. 81 गावची पाणीपुरवठा योजना यापुढेही सुरू राहणार आहे, अशी ग्वाही पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील  यांनी दिली.
     पुढे ते म्हणाले की शिवसेनेने अनेक नेत्यांना  मोठे  केले आहे ज्यांची पात्रता नसतानासुद्धा त्यांना अनेक मोठी पदे दिले आहेत.स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे हे योगदान महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही.सध्या भाजप सरकार ने सूडबुद्धीने अनेकांवर करत असलेल्या ईडीच्या कारवाया सर्व सामान्यांचा विनोदाचा विषय झाला आहे. ईडीच्या चौकशा लावल्या तरी सच्चा शिवसैनिक अशा चौकशांना घाबरत नसल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी दिले.
       यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपल्या मनोगतात या दोन वर्षांमध्ये आपण केलेल्या विकास कामाचा आढावा सांगून नक्कीच या तालुक्याचा विकासाच्या बाबतीत चेहरामोहरा बदलण्याचा आपलं स्वप्न तमाम सांगोला तालुक्याच्या जनतेच्या मनातील विकास घडवून आणल्याशिवाय राहणार नसल्याचे प्रतिपादन दिले. सांगोला तालुक्यातील प्रलंबित सिंचनाच्या अनेक योजना लवकरच मार्गी लागतील असे सांगून विकासाच्या बाबतीत आणि सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी आपण तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.हा सत्कार माझा एकट्याचा नसून तालुक्यातील जनतेचा सत्कार असल्याचे ही त्यांनी या वेळी सांगितले. या कार्यक्रमासाठी सांगोला शहर आणि तालुक्यातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Reactions

Post a Comment

0 Comments