पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सच्या लातूर येथील दालनाचा शानदार शुभारंभ
सांगोला,(कटूसत्य वृत्त):- पुरुषोत्तम नारायण गाडगीळ ज्वेलर्स च्या महाराष्ट्रातील अग्रगण्य पेढीचे नवे दालन चैनसुख रोड,लातूर येथे सुरू करण्यात आले आहे. या दालनाचा भव्य उद्घाटन सोहळा महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अमित देशमुख यांच्या शुभहस्ते व महाराष्ट्राचे पर्यावरण पाणीपुरवठा, रोजगार राज्यमंत्री नामदार संजयजी बनसोडे, लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.सांगोला, जिल्हा सोलापूर येथील पीएनजी शाखेला मिळालेला उस्फुर्त प्रतिसाद पाहता प्रा. प्रबुद्धचंद्र झपके व विलास क्षीरसागर यांच्या 'आदर्श ज्वेलर्स' यांना लातूर येथील फ्रॅंचाईझी मिळाली असून अवघ्या एका महिन्यांमध्ये भव्य असे दालन उभारून लातूरकरांच्या सेवेत दाखल केल्याबद्दल नामदार देशमुख यांनी आपल्या मनोगतून गाडगीळ, झपके व क्षिरसागर परिवाराचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
नामदार बनसोडे यांनी पीएनजी च्या भव्य दालनाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. महापौर गोजमगुंडे लातूर शहराचे प्रथम नागरिक या नात्याने पीएनजी उद्योग समूहाचे स्वागत करत लातूर शहरांमध्ये येणाऱ्या अशा नवीन व्यवसायांना नेहमी सहकार्य केले जाईल असे सांगितले.
याप्रसंगी पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक पराग गाडगीळ,राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील-नागराळकर, फ्रॅंचाईझी हेड अमित वैद्य, प्रा.प्रबुद्धचंद्र झपके,विलास क्षीरसागर, ॲड.किरण जाधव, प्रशांत पाटील,चंदन पाटील-नागराळकर आदी मान्यवर, ग्राहक, लातूर व सांगोला शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
यावेळी 'अनोखी दिवाळी' या योजनेअंतर्गत हिऱ्याच्या दागिन्यांच्या घडवणारी वर १०० टक्के पर्यंत व सोन्याच्या दागिन्यांच्या घटनाळीवर २० टक्के पर्यंत सूट या स्किम चा फायदा ग्राहकांना मर्यादित काळापुरता घेता येईल असे आवाहन पराग गाडगीळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.गणेश बेळंबे यांनी केले.
0 Comments