कुर्डुवाडीत लसीकरण व नेत्र तपासणी मोफत शिबिर संपन्न
कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हयाचे माजी पालकमंत्री तथा आ.विजयकुमार (मालक) देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्त दि.१९ रोजी कुर्डुवाडीत नागरिकांसाठी लसीकरण तसेच मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. कुर्डुवाडीत पोस्ट रोड येथे सोलापूर जिल्हा अध्यक्ष संतोष क्षीरसागर युवा मंच च्या वतीने हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.सदर लसीकरण मोहिमेत २८९ नागरिक महिला नी सहभाग नोंदवला,मोफत नेत्र तपासणी शिबिरात ३८९ जणांची तपासणी करण्यात आली असून यामध्य वयोवृद्ध लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.
कुर्डुवाडी शहरातील जेष्ट नागरिकांना लसीकरणबाबत होत असलेले अडचणी पाहून कुर्डुवाडी मध्ये लसीकरण तसेच मोफत नेत्र तपासणीचे आयोजन करण्यात आले असे युवा मंच चे अध्यक्षष संतोष क्षीरसागर यांनी सांगितले
प्रारंभी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार धोका,अनंद कोठारी,निलेश संचेती,अतुल दोशी,नागेश वेदपाठक,विजयकुमार धोका,सुरज पुर्वत,अमर गुंजाळ, बहुबली फडे,श्रणीक धोका,वरकुटेचे तुकाराम पाटील,नंदकुमार देवकते, गंगाराम लांडे,हर्षद मुलाणी,उमेश पाटील,विकास(तात्या) इंगोले,जितेंद्र गायकवाड,युवराज कोळी,बाळासाहेब शेंडगे,राजेंद्र वाल्मिकी,आकाश लांडे,सदर लसीकरण व नेत्र तपासणीच्या कार्यक्रमाचे उदघाटन आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यासाठी रवी शिंदे,अक्षय शिरसागर,रियाज शेख,सनी इंगोले,रोहित शिरसागर, सुनिल तडकासे,औदुंबर गौडरे,नितीन कोळी,अकील मुलानी, अनिल क्षिरसागर,रवि पाटोळे,शुभम क्षिरसागर,गजानन इंगोले,अभिषेक क्षीरसागर,मयूर क्षिरसागर,सुरज गुळवे व संतोष क्षिरसागर युवा मंच व मित्रपरिवारने परिश्रम घेतले, या करिता न.पा.आरोग्य विभाग अधिकारी-कर्मचारी आणि ग्रामीण रुग्णालय कुर्डूवाडी डॉक्टर व नर्सेस यांचा सहयोग लाभला.
0 Comments