टेंभुर्णी- करमाळा -जातेगाव रस्ता दुरुस्त करण्यास सुरुवात प्रहार संघटनेची प्रशासनाने घेतली दखल
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- टेंभुर्णी- करमाळा जातेगाव रस्त्याची दुरवस्था झाली आहे व खोलवर खड्डे पडले आहेत त्यासाठी प्रहार संघटनेने संबंधित अधिकाऱ्याची अंत्ययात्रा काढून रस्त्यात पडलेल्या खड्ड्यात पुरणार म्हणून दिनांक 4/ 10/ 2021 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा यांना आंदोलनाचे निवेदन देण्यात आले होते. आणि करमाळा पोलीस स्टेशन यांनाही देण्यात आले होते. दिनांक 15/ 10 /2021रोजी आंदोलन करणार होतो. पण हिंदू धर्माचा सण दसरा असल्यामुळे सुट्टी असल्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून 18 /10 /2021 रोजी आंदोलनाचा इशारा दिला होता. पण माननीय पोलीस निरीक्षक करमाळा पोलीस स्टेशन सूर्यकांत कोकणे साहेब यांनी प्रहार संघटनेच्या आंदोलनाची दखल घेत संबंधित सार्वजनिक बांधकाम उपविभाग करमाळा यांची तातडीची बैठक बोलावून घेतली त्यावेळी सार्वजनिक बांधकाम उपविभाग करमाळा यांचे अभियंता उबाळे साहेब व सुनील वाघ साहेब उपस्थित होते .आणि आमचे प्रहार संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना बोलावून घेऊन बैठक घेतली त्यावेळी सर्व मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली आणि लवकरात लवकर खड्डे बुजवून रस्ता तयार होईल असे आश्वासन देण्यात आले. जातेगाव पासून आज काम चालू झाले आहे .आणि दिनांक 16 तारखेपासून टेम्भूर्णी पासून काम चालू होईल आणि लवकरात लवकर रस्ता दुरुस्ती काम डांबरी काम करून पूर्ण होईल. असे आश्वासन देण्यात आले. हे प्रहार संघटनेने मान्य केले व संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा व पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे साहेब यांचे अभिनंदन केले आणि हे लवकरात लवकर करावे. अशी विनंती केली. अन्यथा आम्ही नंतर निवेदन न देता अचानक पणे आंदोलन करणार असा इशारा प्रहार संघटनेने दिला हे जे काम चालू झालेली ही फक्त संघटनेची ताकद आहे आणि दहशत आहे. त्यावेळी उपस्थित आमचे प्रहारचे पदाधिकारी पश्चिम महाराष्ट्र प्रहार संघटना औद्योगिक अध्यक्ष अमोल जगदाळे, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील, करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर ,करमाळा तालुका उपाध्यक्ष सोमनाथ जाधव, पप्पू ढवळे, करमाळा तालुका संपर्कप्रमुख सागर भाऊ पवार ,युवा तालुकाध्यक्ष विकी मोरे पांगरे गावचे सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील ,विठ्ठल आबा मस्के राजुरी गावचे आबासाहेब टlपरे. व इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments