Hot Posts

6/recent/ticker-posts

लायन्स क्लब ऑफ सांगोला कडून अन्नदान सप्ताह

 लायन्स क्लब ऑफ सांगोला कडून अन्नदान सप्ताह



सांगोला (कटूसत्य वृत्त):- इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज आंतरराष्ट्रीय अध्यक्ष ला.डग्लस अलेक्झांडर यांचे वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या आवाहनानुसार माजी प्रांतपाल ला‌.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे मार्गदर्शनाखाली लायन्स क्लब ऑफ सांगोला यांचे वतीने मातोश्री वृद्धाश्रम सांगोला येथे दि.१५ ऑक्टोबर २०२१ ते २१ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत अन्नदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. 
      यामध्ये १५ ऑक्टोबर  २०२१ रोजी  लायन्स क्लब ऑफ सांगोला अध्यक्ष ला.प्रा. धनाजी चव्हाण, १६ ऑक्टोबर  प्रथम उपाध्यक्ष ला.सुनील झपके,१७ ऑक्टोबर खजिनदार ला.काकासो नरूटे,१८ऑक्टोबर सचिव ला.उन्मेष आटपाडीकर,१९ ऑक्टोबर कॅबिनेट ऑफिसर ला. नरेंद्र होनराव,२० ऑक्टोबर सदस्य ला.यतिराज सुरवसे व २१ऑक्टोबर २०२१ रोजी कॅबिनेट ऑफिसर ला.मिलिंद फाळके यांनी अन्नदान केले. 
         अंतरराष्ट्रीय लायन्स क्लब संघटनेच्या प्रमुख पाच उपक्रमांपैकी *Ralieving the Hungar* हा उपक्रम आहे.या अतर्गत मातोश्री वृद्धाश्रम सांगोला येथे अन्नदान प्रसंगी लायन्स क्लब ऑफ सांगोला पदाधिकारी, सदस्य दररोज मोठ्या संख्येने उपस्थित होते. व प्रत्येकाला या कार्यातून  आत्मीक समाधान मिळत होते.या प्रसंगी  हे अन्नदान सप्ताहापुरते मर्यादित न ठेवता लायन्स क्लब ऑफ सांगोला सदस्यांनी वेगवेगळ्या औचित्यानुसार  अन्नदान करण्याचा निश्चय केला. याचाच भाग म्हणून दि.२३ ऑक्टोबर२०२१ रोजी सदस्य ला.प्रा.शिवशंकर तटाळे यांनी चिरंजीव सुयश तटाळे याच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान केले.
      याप्रसंगी मातोश्री वृद्धाश्रम सांगोलाचे प्रमुख मा.राहुल जाधव, कॅबिनेट ऑफिसर ला. मिलिंद फाळके, ला.नरेंद्र होनराव,लायन्स क्लब ऑफ सांगोला अध्यक्ष ला.प्रा.धनाजी चव्हाण,सचिव ला.उन्मेष आटपाडीकर,ला.प्रा. शिवशंकर तटाळे,ला.प्रा.इसाक मुल्ला,सुयश तटाळे व मित्रपरिवार उपस्थित होते.


Reactions

Post a Comment

0 Comments