सह.दि.न्यायाधीश क.स्तर सौ.एस.के.देशमुख यांचे अध्यक्षतेखाली एखतपुर येथे लोकअदालत व कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न
सांगोला (कटूसत्य वृत्त):- परस्परातील हेवेदावे,वाद-विवाद व कायदेशीर लढाया यामुळे सामान्य नागरिकांचा वेळ व पैसा विनाकारण खर्च होतो. समाजातील सामाजिक सलोखा अबाधित ठेवून जास्तीत जास्त खटले हे तडजोडीने मिटल्यास सामाजिक शांतता टिकेल. म्हणून लोकांनी लोक अदालत तसेच कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सांगोला येथील सह. दिवाणी न्यायाधीश सौ. एस. के. देशमुख यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांगोला तालुका विधी सेवा समिती व विधिज्ञ संघ सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि 29 ऑक्टोबर रोजी एखतपूर ता. सांगोला येथे आयोजित केलेल्या लोकअदालत व कायदे विषयक मार्गदर्शन शिबिरात सह. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर सौ. एस. के. देशमुख बोलत होत्या. यावेळी त्यांनी परिसरातील उपस्थित नागरिकांना विधी सेवेबाबतची सखोल व सविस्तर माहिती सोप्या आणि सामान्य नागरिकांना समजेल अशा भाषेत सांगितली व महिला विषयक कायद्याबाबत जनजागृती केली. ॲड. एस बी पाटील यांनी महिलाविषयी कायदे व ॲड. एस एम पत्की यांनी कामगार कायदे याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी पंचायत समिती सदस्य सुभाष इंगोले, एखतपूरच्या सरपंच सौ.मोरे, विधीज्ञ संघ सांगोलाचे अध्यक्ष ॲड. विश्वास गायकवाड, उपाध्यक्ष ॲड. नितीन बाबर, सचिव ॲड. टी.एस.तोरणे आदींसह सांगोला विधीज्ञ संघाचे सर्व पदाधिकारी एखतपूर ग्रामपंचायतचे सर्व सदस्य परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या लोकअदालत व कायदे विषयक मार्गदर्शन शिबिरात प्रस्तावना ॲड. विश्वास गायकवाड यांनी सूत्रसंचालन ॲड. गजानन भाकरे यांनी तर आभार प्रदर्शन पंचायत समिती सदस्य सुभाष इंगोले यांनी केले.
0 Comments