टेंभुर्णी कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय चर्चासत्र संपन्न
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-टेंभुर्णी येथील विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष , इंग्रजी , मराठी , हिंदी विभाग आणि सोलापूर विद्यापीठ इंग्रजी प्राध्यापक संघटना ( सेटो) यांच्या संयुक्त विद्यमाने ' भाषा, साहित्य, संस्कृती आणि अनुवाद ' या विषयावरती एक दिवशीय आंतरराष्ट्रीय ऑनलाईन चर्चासत्र संपन्न झाले. या आंतरराष्ट्रीय ऑनलाइन चर्चासत्राचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमासाठी बीजभाषक म्हणून मुंबई विद्यापीठाचे माजी इंग्रजी विभागप्रमुख तथा प्राध्यापक डॉ. शिवाजीराव सरगर उपस्थित होते. त्यांनी साहित्य, भाषा,संस्कृती आणि अनुवाद यांच्या अनुषंगाने आंतरविद्याशाखीय मागोवा घेतला. या आंतरराष्ट्रीय ऑनलाइन चर्चासत्रासाठी श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आ. बबनदादा शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.
या चर्चासत्रासाठी साधन व्यक्ती म्हणून अमेरिकेतील विस्कॉन्सिन मेडिसन विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. फ्रांकॉइस टोशो , राणी चन्नम्मा विद्यापीठ कर्नाटक येथील डॉ विनोद गायकवाड , महाराष्ट्रातील प्राचार्य सुनीलकुमार लवटे आणि दक्षिण भारतातील प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री मेघना गावकर उपस्थित होते.
या चर्चासत्रामध्ये डॉ फ्रांकॉइस टोशो यांनी मानवी जीवनामध्ये साहित्य , भाषा , संस्कृती आणि अनुवाद यांचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व विशद केले. मूल्याधारित शिक्षण प्रणाली आणि आणि सुसंस्कृत समाजासाठी साहित्य , भाषा आणि अनुवादाची नेमकी भूमिका कशी असावी याबद्दल संशोधनात्मक मांडणी केली.
या एक दिवशीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये सर्वच साधन व्यक्तींनी भाषा , साहित्य , संस्कृती आणि अनुवादाच्या अनुषंगाने साधक-बाधक तसेच संशोधनात्मक मांडणी केली.
या चर्चासत्रामध्ये जगभरातून 725 जणांनी प्रत्यक्ष नोंदणी केली. तसेच 225 संशोधक विद्यार्थ्यांनी विविध विषयावरती शोधनिबंध सादर केले. हे सर्व शोधनिबंध यूजीसी केअर लिस्टेड जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात येणार आहेत.
या एक दिवशीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे स्वागत आणि प्रास्ताविक अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. नेताजी कोकाटे यांनी केले तर तर उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. महेंद्र कदम यांनी भूषवले.
या चर्चासत्रामध्ये साधन व्यक्तींनी मांडलेल्या भूमिकांचा थोडक्यात मागोवा सेटोचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ. अशोक कदम यांनी घेतला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेटोचे सेक्रेटरी डॉ. सचिन लोंढे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. बाळासाहेब दास आणि प्रा. झाकिरहुसेन मुलाणी यांनी केले.
या चर्चासत्रासाठी जगभरातून विविध विषयांचे संशोधक विद्यार्थी , प्राध्यापक , शिक्षक, शिक्षणतज्ञ , विविध समित्यांचे सदस्य , महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक , विद्यार्थी उपस्थित होते
0 Comments