Hot Posts

6/recent/ticker-posts

आतकरे कुंटुंबाना शासन स्तरावरुन सर्वतोपरी मदतीसाठी प्रयत्नशील-जिल्हाधिकारी शंभरकर

 आतकरे कुंटुंबाना शासन स्तरावरुन सर्वतोपरी मदतीसाठी प्रयत्नशील-जिल्हाधिकारी शंभरकर




आतकरे कुंटुंबांचे केले सांत्वन पावसात केली ट्रक्टर मधून जावून बंधाऱ्याची व नुकसानग्रस्त शेतीची पाहणी


मोहोळ (कटूसत्य वृत्त):-मोहोळ तालुक्यातील देगाव(वा)  येथील भोगावती  नदीवरील बंधाऱ्यावरुन वाहून जावून मयत पावलेल्या शेतकरी  विनायक कृष्ण आतकरे (वय ५५) हे गुरुवार ७ ऑक्टोबर २०२१ रोजी मृत्यू  झाला होता.  कै विनायक आतकरे  कुंटुंबाचे  आमदार यशवंत माने,जिल्हाधिकारी मिलिंद  शंभरकर,जि प सदस्य उमेश पाटील,अंजिक्यराणा पाटील  यांनी घरी जाऊन कुटूंबियाची भेट घेऊन सांत्वन केले.यावेळी मोहोळ-वैराग रोडपासून देगाव येथील कोल्हापूर पध्द्तीचा बंधारा एक किलोमीटर अंतरावर आहे. त्याठिकाणी जाणारा रस्ता खराब व चिखलमय झाल्याने वाहनाचा ताफा रोडवर उभा करण्यात आला होता. रोडपासून ट्रक्टरमध्ये उभा राहून प्रवास करत  बंधाऱ्याची व नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.संबंधित पाटबंधारे आधिकर्यांना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी कामाबाबत माहिती घेऊन बंधाऱ्याच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करीत तात्काळ अहवाल तयार करून काम चांगले करण्याच्या सक्त सूचना दिल्या.बंधाऱ्याची पाहणी करून परतत असताना जोरदार पावसाला सुरुवात झाली अन जिल्हाधिकारी, आमदार, जि प सदस्यसह सर्वजण ओलेचिंब भिजले.तसेच मयत शेतकरी विनायक आतकरे यांच्या घरी जाऊन कुटूंबियाची भेट सांत्वन केले. यावेळी कुटूंबियाला मानसिक आधार देत शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.यावेळी जि प सदस्य उमेश पाटील,पं स सभापती रत्नमाला पोतदार, पं स सदस्य अजिंक्यराणा पाटील,सोलापूर जिल्हा दुध संघाचे संचालक दीपक माळी,तहसीलदार प्रशांत बेडसें पाटील, नायब तहसीलदार भालचंद्र यादव, सरपंच आण्णासाहेब घोडके, बबन दगडे, ग्रामसेविका राणी चव्हाण, ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments