लोकनेतेच्या आजवरच्या प्रगतीमध्ये उत्पादकांचा वाटा सिंहाचा
यापुढील काळातही लोकनेते कारखान्याला सहकार्य कायम ठेवा संस्थापक अध्यक्ष राजन पाटील यांची भावनिक कृतज्ञता
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-लोकनेते अण्णांच्या कार्य प्रेरणेतूनच मोहोळ तालुक्यासह परिसरातील ऊस उत्पादकांच्या सर्वांगीण हितासाठीच आपल्या लोकनेते कारखान्याची उभारणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विशेष सहकार्यामुळे करू शकलो. शेतकऱ्यांना अपेक्षित ऊस दर देता यावा यासाठीच सहवीज निर्मिती आणि आसवणी प्रकल्पाची उभारणी लोकनेतेने केली. उभारणी पासून आजतागायत पार पडलेल्या सर्व गळीत हंगामाची एफ. आर. पी.ची रक्कम त्याचबरोबर कामगार बांधव आणि वाहतूकदारांची देयके देखील वेळेवर अदा करत लोकनेते कारखान्याने सर्वच क्षेत्रात विश्वासार्हता जपण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. या गळीत हंगामातही उत्पादक बांधवांनी कारखान्यास सहकार्य कायम ठेवत विक्रमी ऊस गाळप करून हा देखील गळीत हंगाम यशस्वी करावा असे आवाहन लोकनेते कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष राजन पाटील यांनी केले. लक्ष्मीनगर नगर येथील लोकनेते बाबुराव पाटील कारखान्याच्या सन 2021-22 या 18 व्या गळीत हंगामाचा बॉयलर प्रदीपन समारंभ कामती -कुरुल भागातील राष्ट्रवादी नेते जालिंदरभाऊ लांडे आणि सौ कमलताई जालींदर लांडे या उभयतांच्या हस्ते कारखान्याच्या कार्यस्थळावर रविवारी सकाळी साडेदहा वाजता पार पडला. या कार्यक्रमानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करतांना संस्थापक -अध्यक्ष राजन पाटील बोलत होते. यावेळी तालुक्यासह जिल्ह्यातून आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत लोकनेतेचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी केले. यावेळी आयोजित सत्यनारायण महापूजेचे पौरोहित्य वेद विशारद बाजीराव जोशी यांनी केले. लोकनेते कारखान्याच्या कार्यक्षेत्रासह आजूबाजूच्या परिसरात असलेला ऊस दरवर्षी इतकाच आहे. या वर्षी देखील अतिरिक्त ऊस होणार नसल्याने प्रत्येक ऊस उत्पादकांचा ऊस गळीतासाठी आणण्यासाठी लोकनेते कारखाना वचनबद्घ आहे. प्रत्येकाचा ऊस वेळेत लोकनेते कारखाना गळीतासाठी आणणार आहे अशी ग्वाही यावेळी कार्यकारी संचालक ओमप्रकाश जोगदे यांनी सर्व ऊस उत्पादकांना यावेळी दिली. यावेळी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष राजन पाटील, चेअरमन बाळराजे पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक ओमप्रकाश जोगदे, मोहोळचे सभापती रत्नमाला पोतदार, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अस्लमभाई चौधरी, कारखान्याचे संचालक तथा राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, शुक्राचार्य हावळे, संदीप पवार, अशोक चव्हाण, संभाजी चव्हाण, मदन पाटील नागेश साठे शिवाजीराव सोनवणे, देवानंद गुंड- पाटील, नानासाहेब डोंगरे, भारत सुतकर, ज्ञानेश्वर चव्हाण, अनिल कादे, हनुमंत पोटरे, पोपटराव जाधव, दत्तात्रय पवार, विक्रमसिंह पाटील, रामदास चवरे, सचिन चव्हाण, सचिन चवरे, विजय कोकाटे, राम कदम, जगन्नाथ कोल्हाळ, सज्जनराव पाटील, बबन दगडे, हेमंत गरड, रामराजे कदम, हरीभाऊ अवताडे, प्रमोदबापू डोके, शौकतभाई तलफदार, सिंधुताई वाघमारे, ज्ञानेश्वर चव्हाण, रणजित देशमुख, शिवाजी चव्हाण, राजकुमार पाटील, आनंद गावडे, शिवाजी पाटील, तानाजी गुंड-पाटील दिलीप पाटील, सचिन भानवसे, विकास कोकाटे इत्यादी सह मोहोळ शहर आणि तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि लोकनेते कारखान्याचे ऊस उत्पादक बांधव उपस्थित होते.
0 Comments