Hot Posts

6/recent/ticker-posts

डी घरकूलमधील जड वाहतूक मार्गात बदल

 डी घरकूलमधील जड वाहतूक मार्गात बदल


 

 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- गोदुताई परुळेकर नगर विडी घरकुलमधून येणारी व जाणारी जडवाहतूक (अत्यावश्यक सेवेची वाहने वगळून) काही कालावधीसाठी 21 सप्टेंबर 2021 च्या मध्यरात्रीपासून पुढील आदेशापर्यंत बंद राहणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 च्या कलम 33 (1)  (ब) अन्वये जड वाहतूक सकाळी 06:00 ते 13:00 व 16.00 ते 21:00 वाजेपर्यंत बंद राहीलमात्र यासाठी पर्यायी मार्ग चालू राहणार आहेत. वळसंग पोलीस ठाणेअंतर्गत अमन चौकाला पर्यायी मार्ग साखर कारखाना-कुंभारी-अक्कलकोट सोलापूर रोड-विजय नगरविजय नगरला पर्यायी मार्ग विजय नगर- सोलापूर अक्कलकोट रोड- कुंभारी- साखर कारखाना आणि सोलापूर अक्कलकोट रोडवरील ब्रिजखालून विडी घरकूलकडे जाणारा रोडला पर्यायी मार्ग- सोलापूर अक्कलकोट रोडने-कुंभारी-साखर कारखाना असा राहणार असल्याचे श्रीमती सातपुते यांनी पत्रकात नमूद केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments