बोगस नोंद करून वारसा हक्काने मिळालेली जमिनी हडप...!
संरपंच पासून मंडल अधिकाऱ्यांपर्यंत तेरा जणांविरोधात गुन्हा दाखल मोहोळ तालुक्यातील प्रकार
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- वारसा हक्काने आजीला मिळालेल्या जमिनीवरती वारसा हक्काने एकुलत्या एक मुलाची वारस नोंद असताना त्याच्या चुलत भावाने गावकामगार तलाठी , मंडल अधिकारी ग्रामसेवक , सरपंच, पोलीस पाटील, व कोतवाल यांना हाताशी धरून मयताचे बोगस दाखले , खोट्या सह्या , बनावट कागत पत्रे बनवुन त्या जमिनी वरती ७ जणांची बोगस नोंद लावल्या प्रकरणी मंडल अधिकारी , तलाठी , ग्रामसेवक व सरपंचासह १३ जणांवरती मोहोळ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची घटना तालुक्यातील ढोकबाभळगाव येथे घडली.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार देविदास मनोहर बेलेराव यांची आजी अफ्रुका लक्ष्मण बेलेराव हिला शासनाकडून गायराण जमीन मिळाली होती. अफ्रुका बेलेराव यांच्या मृत्यूनंतर सदर जमिनीवरती अफ्रुका यांचा नातु देवीदास मनोहर बेलेराव यांचे नाव लागले होते . असे असताना देविदास बेलेराव यांचे चुलत भाऊ विकास बेलेराव यानी १ जुलै २०२१ रोजी त्या जमीनी वर आम्हा भावांची नावे लावावीत म्हणून तलाठया कडे अर्ज केला होता . त्या अर्जानुसार ढोकबाभळगाव च्या तलाठ्याने बोगस नोटीसा काढल्या तसेच फिर्यादीची आज्जी अफ्रुका ही सोलापूर येथे मयत झाली असताना ती ढोकबाभळगाव येथे मयत झाल्याचा खोटा दाखला ग्रामसेवकाकडून घेतला. याबरोबरच ढोकबाभळगावचे सरपंच , पोलिस पाटील ,कोतवाल या सर्वांना हाताशी धरून खोट्या सह्या व बोगस दाखले घेवून त्या जमीनी वरती फिर्यादी एकटा वारस असताना इतर सात जनांची नावे वारसदार म्हणून नोंद केल्याचे उघडकीस आले आहे .याप्रकरणी देविदास बेलेराव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ढोक बाभळगावचा कामती विभागाचा मंडल अधिकारी एस. के. बेलभंडारे, ढोकबाभळगाव तलाठी एस एच नकाते, ग्रामसेवक एम के तांबीले, महीला सरपंच रुक्मिणी राजाराम पांढरे, कोतवाल कुंभार, यांच्या सह माजी सरपंच बंडू शंकर मुळे, विकास गंगाराम बेलेराव, तानाजी दशरथ बेलेराव, सरूबाई शिवाजी बेलेराव, रुक्मिणी सतीश माने, जनाबाई गगाराम बेलेराव , जनार्धन गंगाराम बेलेराव ,संगीता शिवाजी सुरवसे या तेरा जनाच्या विरोधात फसवणूकी चा गुन्हा दाखल करण्यात आला असुन या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर खारगे हे करित आहेत .
0 Comments