समर्थ बूथ अभियानातंर्गत सांगोला तालुक्यात आढावा बैठका संपन्न - भाजप तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत

सांगोला (कटूसत्य वृत्त):- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या काळात सांगोला तालुक्यात सेवा व समर्पण अभियान राबविण्यात येणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्ष, संघटना मजबूत करण्यासाठी वन बूथ थर्टी यूथ ही संकल्पना राबविण्यास सुरवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त सांगोला शहर व तालुक्यात सेवा आणि समर्पण अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर समर्थ बूथ अभियानातंर्गत सांगोला तालुक्यात आढावा बैठका संपन्न झाल्या असल्याची माहिती भाजप तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.
नव्या टोकदार राजकारणाचे ब्रँड बनलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील वीस वर्षांपासून सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत. चोवीस तास राजकारणात सक्रिय राहणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. ग्लोबल ते लोकल सर्वच पातळ्यांवर नमो ब्रँडची मोहोर उमटलेली दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 20 दिवसांच्या अभियानाची योजना आखली आहे. या अभियानाला 17 सप्टेंबर पासून सुरुवात केली जाणार असून 7 ऑक्टोबर रोजी याची सांगता होणार आहे. पक्ष, संघटना मजबूत करण्यासाठी वन बूथ थर्टी यूथ असे या अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत असून
या अभियानाला सेवा आणि समर्पणाचं नाव देण्यात आलं आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीची तयारी करण्यासाठी अतिसूक्ष्म पद्धतीने नियोजन करीत वन बूथ थर्टी यूथ ही संकल्पना राबविण्यास सुरवात केली आहे. या अभियानाच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील हजारो कार्यकर्ते भाजपने ऑनलाइन जोडून घेतले आहेत. शुक्रवारी तालुक्यातील घेरडी, कोळा, नाझरा, कडलास या जिल्हा परिषद गटात भाजपचे पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात आल्या. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, माढा लोकसभा विस्तारक शरद झेंडे, जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आलदर, ओबीसी तालुकाध्यक्ष शिवाजी आलदर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, अनुसूचित जमाती तालुकाध्यक्ष तानाजी कांबळे, विलास होनमाने, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष बाळाप्पा येलपले, दिलीप सावंत, दगडू घुटुकडे, गोविंद कोळेकर, वैभव येलपले, संतोष पाटील, विकास वलेकर, नंदकुमार येलपले, श्रीनिवास क्षिरसागर, फैय्युम शेख, पांडुरंग यादव, अजित तवते, संजय केदार, राहुल मंडले, सचिन पांढरे, महेश ओतारी, अमोल मोहिते, अमोल साखरे, हणमंत सरगर, विकास येलपले, मधुकर पवार, अमित पाटील आदी उपस्थित होते.
सद्यःस्थितीला एका बूथला तीस कार्यकर्ते जोडण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघात 291 बूथ आहेत. त्या सर्व बूथला प्रत्येकी 30 कार्यकर्ते जोडण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. भाजपने सर्व बूथप्रमुख व कार्यकर्त्यांची आपल्या ऑनलाइन नेटवर्कशी जोडणी केली आहे. भाजपचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावीपणे अभियान राबविण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त सांगोला शहर व तालुक्यात सेवा आणि समर्पण अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी दिली.
0 Comments