अतुल मालकांच्या झंझावताला,जवळा गटात राष्ट्रवादी घालणार खीळ

सांगोला (कटूसत्य वृत्त):- येत्या काही महिन्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका येत आहेत. नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपन्न झाल्या.काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या जि प च्या निवडणुकीत अनेक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत. काहींनी लगबगीने वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविण्याचा सपाटा सुरू केला आहे, तर काहींनी विवाह सोहळे आणि दुखवट्याच्या कार्यक्रमाला हजर राहून भेटी देत आहेत.तालुक्याचा केंद्रबिंदू ठरलेल्या जवळा जि प गटात आतापासूनच अनेक उमेदवारांनी दौरे, कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेण्यास सुरुवात केली असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.राजकारणातील प्रमुख नेतेमंडळी मात्र मौन मध्ये असल्याचे चित्र दिसून येत आहे.

एखतपुर जि प गटाचे विद्यमान सदस्य अतुल पवार यांनी एखतपुर जि प गटातील गावात उदघाटनाच्या कामाच्या शुभारंभ केला नाही,पण भविष्यातील राजकीय वातावरण पाहता त्यांनी मात्र जवळा गटातील गावात स्वखर्चाने रस्ते,आणि बंधारे दुरुस्तीच्या कामाचा उदघाटन सोहळा केलेला दिसून येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत बैचनी पसरलीआहे. जवळा जि प गट हा कायम माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांचा शब्द प्रमाण मानून आबांनी किंबहुना राष्ट्रवादीने दिलेल्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून दिल्याचा इतिहास आहे. त्यामुळे "जवळा जि प गटात"कुणीही विरोधकांनी उभे राहावे,आम्ही त्यांचा पराभव करू असा आत्मविश्वास आबा आणि बापू प्रेमींनी व्यक्त केला आहे.त्यामुळे अतुल मालक आपण सबुरीने घ्या कारण "राजकारण"आहे,असा सूचक सवाल राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देत आहेत.त्यामुळे अतुल पवार यांना जेवढा हा गट आपल्यासाठी शाबूत आहे,असे वाटते,तेवढा हा गट शाबूत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

एखतपुर जि प गटात अतुल पवार यांनी आपल्या कार्यकाळात लक्षवेधी काम न केल्याचा अनेक राष्ट्रवादीच्या एखतपुर गटातील कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे. परंपरागत बालेकिल्ला असलेल्या या गटात सध्या तरी राष्ट्रवादीचे यशराजे साळुंखे पाटील,डॉ पियुष साळुंखे पाटील, अभिजित नलवडे,विद्यमान सदस्या स्वातीताई कांबळे,सेनेचे भाऊसाहेब रूपनर हे इच्छुक आहेत.आतापर्यत या गटावर दिपक साळुंखे पाटील यांचेच वर्चस्व राहिले आहे. जवळा जि प गटात समाविष्ट असलेल्या अनेक गावांमध्ये मराठा समाजाचे मताधिक्य जास्त असल्याचे चित्र दिसून येत आहे,एकंदरीतच जातीय समीकरणाची जुळवाजुळव करून अनेक उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

हा गट आतापर्यत राष्ट्रवादीच्या वाट्याला आला आहे.येणाऱ्या जि प निवडणुकीत शेकाप, भाजपा आघाडी होण्याची चिन्हे दिसून येत असल्याचे दोन्ही पक्षातील कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. तर राष्ट्रवादी सेना आणि काँग्रेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येणार असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे,पण काँग्रेसने स्वतः स्वबळाचा नारा दिला आहे. एकंदरीतच आगामी जवळा जि प गटाची निवडणूक ही चुरशीची होणार असल्याचे जाणकारातून बोलले जात आहे.
0 Comments