Hot Posts

6/recent/ticker-posts

अविरत कार्यरत सेवावृत्तीचा सन्मान सोहळ्याचे आयोजन जातीय विषमता नष्ट होवून सामाजिक समता निर्माण होणे गरजेचे- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

 अविरत कार्यरत सेवावृत्तीचा सन्मान सोहळ्याचे आयोजन

जातीय विषमता नष्ट होवून सामाजिक समता निर्माण होणे गरजेचे-

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

 







पुणे (कटूसत्य वृत्त):- समाजात जातीय विषमता नष्ट होवून सामाजिक समता निर्माण होणे गरजेचे असून युवा पिढीने मनात  सामाजिक समतेच्या भावनेची जोपासना करीत  समाजातील उपेक्षित घटकांना पुढे नेण्याचे काम करावेअसे मत राज्यपाल भगत शिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.


                               


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थ युवा प्रतिष्ठान आयोजित कोरोना संकटकाळात अविरत कार्यरत सेवावृत्तीचा सन्मान सोहळा राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत भांडारकर इन्स्टिट्यूट येथील नवलमल फिरोदिया सभागृहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी खासदार गिरीष बापटमहापौर मुरलीधर मोहोळआमदार चंदकांत पाटील,  जगदीश मुळीकमाधुरी मिसाळसमर्थ युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश पांडे आदी  उपस्थित होते.



राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणालेकोरोनाच्या काळात डॉक्टरपोलीससामाजिक संस्थाउद्योजकअशा विविध घटकांनी केलेली कामगिरी अतुलनीय आहे. अशा पद्धतीने चांगली कामगिरी सतत केल्यास देश प्रगतीपथावर जाण्यास मदत होते. निष्कलंकनिष्पापनिःस्वार्थी नेतृत्वाच्या शब्दाला महत्व असते असे त्यांनी सांगितले.

खासदार श्री.बापट म्हणालेसत्कार हा सतप्रवृत्तीचा होत असतो. कोरोनाच्या काळात सामान्य माणसाला मदत करुन अनेकांनी समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. सर्वजण मिळून समाजासाठी काम करावेअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


                                       

राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.डॉ. नितीन करमळकरडी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी. पाटीलदलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळेपुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड-19 चे मुख्य समनव्यक सुधीर मेहतापुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकरइस्कॉनचे संजय भोसलेपुणे मनपाचे आरोग्य व स्वच्छता विभागासाठी महापौर मुरलीधर मोहोळसहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे व आरोग्य निरीक्षक कविता शिसोलकर यांचा एकत्रित तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचे प्रतिनिधी अश्विनीकुमार व महेश कर्पे यांचा सत्कार करण्यात आला.

Reactions

Post a Comment

0 Comments