पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाचे आयोजन
आ. सुभाष देशमुखांच्या हस्ते विविध उपक्रमाचे उद्घाटन

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आ. सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त उत्तर तालुक्यातील गावात विविध उपक्रमाचे उद्घाटन आ. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी आ. देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तळागाळातील लोकांसाठी राबवलेल्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवावी, असे आवाहन केले. यावेळी सरपंच इलाही शेख, उपसरपंच गीता लिंबोळे, पूर्वा वाघमारे, राजू सदगार, विशाल जाधव, नंदू पवार,नंदकिशोर पाटील, शशी थोरात, श्रीनिवास पुरुड, व्यंकटेश कोंडी, तुकाराम काळे, अर्चना वडणाल, बसवराज केंगनाळकर व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर देशमुख यांनी बेलाटी गावातील नागरिकांशी संपर्क साधून तेथील समस्या जाणून घेतल्या. यावेळी निर्मला कुंभार आणि प्रभू राठोड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments