लायन्स क्लब सांगोलाकडून पीस पोस्टर चित्रकला स्पर्धेचे आयोजन

सांगोला (कटूसत्य वृत्त):- आंतरराष्ट्रीय लायन्स संघटनेकडून १९८८ साली पीस पोस्टर (जागतिक शांततेविषयक चित्र ) या स्पर्धेचे आयोजन लहान मुलांना बालवयातच जागतिक शांततेचे महत्त्व समजावे आणि त्यांचे याबाबतचे विचार चित्रकलेच्या माध्यमातून जगासमोर यावे या हेतूने करण्यात आले.दरवर्षी घेण्यात येणारे या स्पर्धेत जगभरातील विविध देशांमधील सुमारे सहा लाख मुले- मुली सहभागी होतात.
सन २०२१-२२ या स्पर्धेसाठी लायन्स क्लब प्रांत ३२३४ ड१ प्रांतपाल ला.सुनील सुतार, पीस पोस्टर स्पर्धा प्रांतीय चेअरमन ला.मंगेश दोशी व लायन्स क्लब सांगोलाचे मार्गदर्शक प्रा.प्रबुद्धचंद्र झपके (माजी प्रांतपाल ३२३४ ड १) यांचे मार्गदर्शनाखाली लायन्स क्लब सांगोला कडून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सांगोला तालुका परिसरातील ११ ते १३ वयोगटासाठी ही स्पर्धा खुली असे (दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी ११,१२,१३ वर्षे पूर्ण ) विद्यार्थी-विद्यार्थिनीला या स्पर्धेसाठी एक चित्र पाठवता येईल.या स्पर्धेसाठी चित्र आकार १३×२० इंचापेक्षा(३३×५० सेंमी.)छोटे तसेच २०×२४ इंचापेक्षा (५०×६० सेंमी.) पेक्षा मोठे असू नये या शिवाय त्याला फ्रेम अथवा लॅमिनेशन केलेले नसावे. हाफ साईज ड्रॉईंग पेपर (A2) योग्य राहील. सदर स्पर्धेसाठी चित्राचा विषय *WE Are All Connected* असा आहे.सदर चित्र दिनांक ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे जमा करावे. अधिक माहितीसाठी लायन्स क्लब ऑफ सांगोला अध्यक्ष ला.प्रा.धनाजी चव्हाण - ८२७५०२५१५१,सचिव ला.उन्मेष आटपाडीकर-८२७५४४८७०९ खजिनदार ला.काकासो नरूटे-९४२३३२७४४१, कलाशिक्षक राजेंद्र जाधव- ९८२३९८६७६४ यांच्याशी संपर्क करावा. लायन्स क्लब ऑफ सांगोलाकडून सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रदिले जाईल.उत्कृष्ट पाच चित्रांसाठी बक्षीस व प्रमाणपत्र तसेच या पाच उत्कृष्ट चित्रांमधून एक उत्कृष्ट चित्र प्रांताकडे जाईल तिथून एक चित्र निवडून आंतरराष्ट्रीय लायन संघटनेकडे पाठविली जाईल. महा विजेत्यासाठी ५०० डॉलर,ॲवॉर्ड तसेच विजेता आणि दोन सदस्यांसाठी ( एक पालक व एक क्लब अध्यक्ष अथवा एक सदस्यांना) ॲवॉर्डसाठी मोफत ट्रीप, २३ उपविजेते- मेरीट ॲवॉर्ड, डॉलर आणि प्रमाणपत्र मिळेल. ही सर्व २४ पोस्टर्स पुढील आंतरराष्ट्रीय कनव्हेशन मध्ये प्रदर्शित करण्यात येतील.तरी सांगोला तालुक्यातील वरील वयोगटातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन लायन्स क्लब ऑफ सांगोला कडून करण्यात आले आहे.
0 Comments