Hot Posts

6/recent/ticker-posts

रक्तदान करणे सध्या काळाची गरज - गणेश वानकर

रक्तदान करणे सध्या काळाची गरज  - गणेश वानकर




मोहोळ (कटूसत्य वृत्त):-कोवीड सारख्या आव्हानात्मक परिस्थितीत रक्ततदान शिबिरासारखा आरोग्यदायी उपक्रम राबवून अनेकांचे जीव वाचवण्यासाठी हातभार लावणाऱ्या  जिल्हाप्रमुख हर्षल‌ देशमुख, विजय गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांनी केलेला हा उपक्रम सर्व जिल्ह्यातील युवकांनाही  प्रेरणादायी आहे.असे गौरवोदगार  शिवसेना सोलापूर ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश दादा वानकर यांनी काढले.
विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख हर्षल‌ देशमुख आणि युवा नेते विजय गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त मोहोळ शिवसेना संपर्क कार्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिवसेना सोलापूर ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश दादा वानकर यांच्या शुभहस्ते तसेच शिवसेना माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिपक मेंबर गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.  रक्तदान शिबीर सकाळी ११ ते सायंकाळी ५:३० या कालावधीत सुरू होते. रक्तदान शिबिरात सुमारे ९१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कोव्हिड परिस्थितीत रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात असताना रक्ताची गरज ओळखून रक्तादानासारखा स्तुत्य आणि विधायक उपक्रम राबविल्याबद्दल शिवसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख गणेश दादा वानकर यांनी हर्षल देशमुख यांचे कौतुक केले. 
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दीपक मेंबर गायकवाड शिवसेना नेते बाळासाहेब गायकवाड,  युवासेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख महेश देशमुख, शिवसेना मोहोळ तालुकाप्रमुख अशोक बापू भोसले, विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख लहुजी गायकवाड, शिवसेना नेते नागेश वनकळसे सर, गटनेते महादेव गोडसे, शिवरत्न गायकवाड, विद्यार्थी सेना सोलापूर शहरप्रमुख तुषार आवताडे, विद्यार्थी सेनेचे सोलापूर जिल्हा सचिव रोहित अक्कलकोटे, सोलापूर शहर समन्वयक प्रथमेश तपासे, विद्यार्थी सेना सोलापूर उपशहरप्रमुख विजय मोटे, ॲड.उमेश तळे विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख प्रशांत व्होनमाने, धनंजय बनसोडे , अमर कांबळे, समाधान राऊत, दत्ता थिटे विद्यार्थी सेना मोहोळ तालुकाप्रमुख दादाराजे बेलदर, मोहोळ शहरप्रमुख तेजस माळवदकर,समाधान वाघमोडे, विजय महाडिक, भारत कणसे, शिवप्रसाद ढोले, योगेश माळी,वैभव चव्हाण, सुदन गायकवाड, आकाश थिटे, गिरीश भोसले, शुभम आतकरे, राज अंटद, रुषिकेश कुलकर्णी, आदी शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.


Reactions

Post a Comment

0 Comments