Hot Posts

6/recent/ticker-posts

पर्यटन दिन विशेष - माढा तालुक्यातील चिंचगाव चे महादेव मंदिर ठरतंय आकर्षण

 पर्यटन दिन विशेष - माढा तालुक्यातील चिंचगाव चे महादेव मंदिर ठरतंय आकर्षण



पर्यटन क्षेत्र नावारूपास,स्वर्गिय  प.पु.रामानंद सरस्वती महाराजाच्या  पुढाकारातुन झाली आहे मंदिराची उभारणी 



माढा (कटूसत्य वृत्त):- "ब तिर्थ क्षेत्राचा दर्जा मिळालेले माढा तालुक्यातील-चिंचगावचे महादेव मंदिर,सत्संग  आश्रम गेल्या काही वर्षांपासून पर्यटन क्षेत्र म्हणून नावा रुपास येऊ लागले आहे.कुर्डूवाडी शहरा पासुन अवघ्या काही अंतरावर असलेले हे ठिकाण सदैव  हिरवाईने नटलेला हा परिसर हा अनेक वर्षापासुन पर्यटन स्थळ म्हणून नावा रुपास आला आहे.या मंदिराचे जिर्णोद्धार करणारे रामानंद सरस्वती महाराज यांचे नुकतेच निधन झाले आहे.
उत्तराधिकारी म्हणून  प.पु.श्री शिवचरणानंद सरस्वती महाराज हे गादीवर बसले आहेत.सन १९६२ साली ते या ठिकाणी वास्तव्यास आले होते.ओसाड आणी माळरान असलेल्या या टेकडीवर तत्कालिन छोट्या श्री महादेव मंदिराचा चार वेळा त्यांनी जीर्णोद्धार केला.माढा व जिल्ह्याच्या पंचक्रोशीत त्यांचे लाखो अनुयायी आहेत.

                                             

मंदिर परिसरातील हिरवळ व दाक्षिणात्य पध्दतीचा या मंदिरात पंच देवता असुन श्रावण महिन्यात येथे लाखो भाविक दर्शनाला येतात.५ मे २००५ रोजी विविध राज्यातील वेदशास्त्रसंपन्न विभुतीना आमंत्रित करुन या मंदिरावर अकरा कलश आरोहणाचा भव्य दिव्य असा उत्सव झाला होता.हे मंदिर आणी परिसर (पिकनीक पॉईन्ट) पर्यटन क्षेत्र म्हणुन नावारूपास आले आहे.या सगळ्याचे श्रेय  स्वर्गिय प.पू.रामानंद सरस्वती महाराजांना जाते.चहूबाजूंनी हिरव्या गर्द  निसर्गाच्या सौंदर्याची उधळण करीत  डोंगर माथ्यावर वसलेले माढा तालुक्यातील चिंचगाव टेकडीवरील श्री महादेवाचे   मंदिर आणी सत्संग आश्रम.केवळ माढा तालुक्यातीलच नव्हे तर सबंध  जिल्ह्यातील  भक्त येथे दर्शना बरोबरच  निसर्गाच्या सानिध्यात येण्यासाठी  आवर्जुन  येतात. टेकडीवरील महादेव मंदिरास कैलास पर्वताची उपमा दिली जात असुन प.पु.रामानंद सरस्वती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या  मंदिराचा कारभार सुरू होता.

                                               

या मंदिरास भेट दिलेला भाविक दरवर्षी येथे न  चुकता एकदा तरी येतोच.जणु विठ्ठलभक्ताप्रमाणे येथे आलेल्या भक्तांची महादेवाकडे वारीच  सुरु होते.स्व.प.पुज्य.रामानंद सरस्वती महाराज हे  १५ ऑगस्ट १९६२ साली या टेकडीवर आले होते.सन १९६४_६५ सालच्या भूकंपा मुळे  मंदिरास तडे गेले होते.त्यानंतर तालुक्यातील दानशूर भाविकांच्या लोकवर्गणीतून स्व.रामानंद सरस्वती महाराजांच्या पुढाकारातुन  या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments