Hot Posts

6/recent/ticker-posts

नोंदणी व मुद्रांक विभाग यांच्या बेमुदत संप या आंदोलनाला शिवसेनेचे युवा नेते सोमेश शिरसागर यांचा पाठिंबा

 नोंदणी व मुद्रांक विभाग यांच्या बेमुदत संप या आंदोलनाला शिवसेनेचे युवा नेते सोमेश शिरसागर यांचा पाठिंबा



मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ मोहोळ येथील नोंदणी व मुद्रांक विभागाचे अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटना यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या आंदोलक कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या या आंदोलनाला  पाठिंबा जाहीर करून  त्यांचे प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामाध्यमातून सोडवण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन शिवसेना युवा नेते सोमेश(आबा) क्षीरसागर यांनी दिले. 
रखडलेल्या पदोन्नत्या, रिक्त पदांची भरती, ज्येष्ठता यादी, कोवीड 19  मयत अधिकारी   कर्मचारी यांचे कुटूंबियांना तात्काळ 50 लाखाची मदत, आय- सरिता, ई-फेरफार तसेच इतर सव्हरच्या अडचणी, गुन्हे मागे घेणे, पदनामामध्ये बदल करणे या आणि अशा मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन नोंदणी व मुद्रांक विभाग राजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटना यांचे आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्यांच्या या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देवून शासनाने त्यांना न्याय द्यावा. अशी विनंती मी या माध्यमातून महसूल मंत्री  बाळासाहेब थोरात  यांना करनार आहे असे ते म्हणाले. यावेळी प्रशांत गाढवे, बाळासाहेब वाघमोडे उपस्थीत होते.


Reactions

Post a Comment

0 Comments