Hot Posts

6/recent/ticker-posts

कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांनी लसीकरण वेग वाढविण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

 कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांनी लसीकरण वेग वाढविण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना


मुंबई 
(कटूसत्य वृत्त):- राज्यात काल 
२१ सप्टेंबर रोजी सुमारे ३६ लाख कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस शिल्लक असून ज्या जिल्ह्यांत कमी डोसेस दिले असतील त्यांनी लसीकरणाचा वेग मोठ्या प्रमाणावर वाढवावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले. संसर्ग होऊन देखील लसीकरणामुळे रोगाची तीव्रता कमी असते शिवाय मृत्यूचे प्रमाण नगण्य आहे हे लक्षात घेऊन लसीकरण मोठ्या प्रमाणावर पूर्ण करावे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी रुग्णसंख्या कमी होत असली तरी आरोग्याचे नियम पाळण्यात बेफिकिरी नको असे स्पष्ट केले.
Reactions

Post a Comment

0 Comments